Shani Budh Margi 2025 : नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शनि-बुधाची मार्गी चाल; 'या' राशींना मिळणार गोल्डन चान्स, नशीब बदलायला अवघे 5 दिवस बाकी
Shani Budh Margi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा दोन मोठे ग्रह एकत्र वक्री होतात तेव्हा अनेक राशींसाठी हा एक शुभ काळ ठरतो. ग्रहांच्या या परिवर्तनाने तुम्हाला व्यवसायात चांगला लाभ मिळेल.

Shani Budh Margi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह (Mercury) आणि न्यायदेवता शनि देव (Shani Dev) नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी एकत्र मार्गी होणार आहेत. येत्या 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनि मार्गी (Shani Margi) होतील. तर, त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी बुध आपली सरळ चाल चालणार आहेत. बुध ग्रह 26 फेब्रुवारी तर शनि 26 जुलैपर्यंत सरळ चाल चालणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा दोन मोठे ग्रह एकत्र वक्री होतात तेव्हा अनेक राशींसाठी हा एक शुभ काळ ठरतो. ग्रहांच्या या परिवर्तनाने तुम्हाला व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तर, या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
बुध आणि शनि ग्रहाच्या मार्गी चालीने वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला मोठ्या प्रवासाला जावं लागू शकतं. परदेशातून उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील. जे लोक पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या व्यवसायिकांसाठी देखील बुध आणि शनिची मार्गी चाल लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. जर तुम्ही या कालावधीत नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर तुमच्यासाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या कालवधीत तुम्ही मल्टीपल व्यवसाय देखील करु शकता.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांना देखील या काळात चांगला लाभ मिळेल. तुमच्या कामातून दिवसेंदिवस तुमची प्रगती होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, तुमच्यातील कलागुणांना देखील चांगला न्याय मिळेल. जर तुमच्या व्यवसायात तुमचं नुकसान होतंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. शनि आणि बुध ग्रहाच्या साथीने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















