Shani Asta 2025 : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शनीचा होणार अस्त; 'या' 4 राशींवर पुढचे 40 दिवस सतत असणार टांगती तलवार
Shani Asta 2025 : शनीच्या अस्ताचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Shani Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीला (Shani Dev) सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह म्हटलं जाते. शनीच्या (Lord Shani) राशीत होणाऱ्या संक्रमणाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी शनी 40 दिवसांसाठी अस्त होणार आहे. याचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
शनीचा अस्त कधीपासून कधीपर्यंत असणार आहे?
द्रिक पंचांगानुसार, 28 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी 07 वाजून 06 मिनिटांनी शनी अस्त होणार आहे. तर, 9 एप्रिल रोजी म्हणजेच बुधवारी सकाळी 05 वाजून 03 मिनिटांनी शनीचा उदय होणार आहे. याचाच अर्थ, शनीचा अस्त तब्बल 40 दिवसांपर्यंत असणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या अकराव्या चरणात शनीचा अस्त होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना या काळात सतर्क राहण्याची गरज आहे. तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल. या काळात कोणताही निर्णय घेताना सावध घेणं गरजेचं आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार संकटाचा असणार आहे. या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. तसेच, पैशांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, विनाकारण पैसे खर्च करु नका. तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या सातव्या चरणात शनीचा अस्त होणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागेल. तसेच, ऑफिसमधील पॉलिटिक्सचा तुम्ही शिकार होऊ शकता. कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या दुसऱ्या चरणात शनीचा अस्त होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, तुम्हाला मानसिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला आजारपणाचा सामना करावा लागेल. यामुळे तुम्ही फार चिंतेत असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















