Shani Asta 2025 : कुंभ राशीत शनीचा अस्त होताच 'या' 3 राशी ठरतील लकी; शनी बनवणार धनवान, पैशांचा पाडणार पाऊस
Shani Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 28 फेब्रुवारी ते 8 एप्रिलपर्यंत म्हणजेच तब्बल 40 दिवस शनी अस्त अवस्थेत असणार आहे.

Shani Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) सध्या कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. पुढच्याच महिन्यात शनी (Lord Shani) आपली रास बदलून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मात्र, त्याआधी शनीचा अस्त होणार आहे. याचवेळेस शनी एका राशातून दुसऱ्या राशीत संक्रमण करणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 28 फेब्रुवारी ते 8 एप्रिलपर्यंत म्हणजेच तब्बल 40 दिवस शनी अस्त अवस्थेत असणार आहे. याचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
शनीच्या अस्त होण्याने तूळ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. या काळात तुमच्यावर शनीची विशेष कृपा असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असून अनेक नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा परदेशात जाण्याचा देखील प्लॅन ठरु शकतो. मुलांच्या बाबतीत तुमच्या सर्व चिंता दूर होतील. अभ्यासत त्यांचं मन रमेल. मात्र, आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं अस्त होणं लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची प्रकृतीही एकदम ठणठणीत असेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही फार प्रसन्न असाल. मित्र-परिवाराच्या भेटीगाठी होतील. तसेच, तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न पाहायला मिळेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला सहभागी होऊ शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीचा अस्त कुंभ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, धनदेवता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. तुमच्या व्यवसायात तुमच्या जोडीदारबरोबर व्यवहार चांगला असेल. मात्र, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















