Shani Amavasya 2023 : 21 की 22 जानेवारीला असणार मौनी अमावस्या? स्नान, दान करण्याची योग्य वेळ जाणून घ्या
Shani Amavasya 2023 : पौष महिन्यात येणारी मौनी अमावस्या ही या वर्षातील पहिली शनिश्चरी अमावस्या असेल. जाणून घ्या अमावस्येची नेमकी तिथी, स्नानाचा मुहूर्त आणि या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे?
Shani Amavasya 2023 : 2023 या नववर्षातील पौष महिन्यात येणारी मौनी अमावस्या (Mauni Amavasya 2023) ही या वर्षातील पहिली शनैश्चरी अमावस्या असेल. स्कंद पुराणात या अमावस्या तिथीला वेगळे महत्व आहे.
दोष दूर होतात
धार्मिक मान्यतेनुसार, मौनी अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने माणसाचे सर्व दोष दूर होतात, त्याला स्वर्ग लोकात स्नान मिळते. या दिवशी उपवास, नैवेद्य आणि दान केल्याने अशक्य असलेली कामेही पूर्ण होतात. जाणून घ्या मौनी अमावस्येची नेमकी तिथी, स्नानाचा मुहूर्त आणि या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे?
21 की 22 जानेवारीला मौनी अमावस्या कधी?
2023 ची पहिली अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या अतिशय विशेष मानली जाते. हिंदू पंचागानुसार, पौष महिन्याची अमावस्येची तिथी शनिवार, 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 06.17 पासून सुरू होईल आणि 22 जानेवारी 2023 पर्यंत पहाटे 02.22 पर्यंत राहील. उदयतिथीनुसार मौनी अमावस्या 21 जानेवारी 2023 रोजी आहे. या दिवशी स्नान आणि दान करणे शुभ राहील.
20 वर्षांनी शनि अमावस्येचा योगायोग
ज्योतिषांच्या मते, जवळपास 20 वर्षांनंतर मौनी अमावस्या शनिवारी असताना असा योगायोग घडला आहे. यासोबतच 30 वर्षांनंतर या अमावस्येच्या दिवशी शनिदेव कुंभ राशीत विराजमान होणार आहेत. शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनैश्चरी अमावस्या म्हणतात. मौनी अमावस्येच्या दिवशी मौन व्रत करून नैवेद्य तसेच दान करणार्याला शनिदोष, पितृदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. मौनी अमावस्येला मौन धारण केल्याने व्रत, श्राद्ध आणि दान केल्याने दु:ख, दारिद्र्य, कालसर्प, पितृदोष दूर होतात. यासोबतच शनिदेवाच्या आराधना केल्यामुळे सुरू होणारा त्रास दूर होतो.
शनैश्चरी अमावस्येला काय दान करावे?
-शनी अमावस्येला एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि त्यात चेहरा पाहा, त्यानंतर ते दान करा.
-असे मानले जाते की याने माणसाचे सर्व दोष दूर होतात. शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळेल.
-मौनी अमावस्येला काळे तीळ पाण्यात मिसळून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.
-काळे तीळ दान करावे. यामुळे वाईट गोष्टी घडणार नाहीत.
-जो व्यक्ती मोहरीचे तेल, उडीद डाळ, चादर, लोखंड दान करतो तो शनिदेवाच्या आशीर्वादास पात्र ठरतो.
-त्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. पितरांचा आशीर्वाद मिळतो
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या