Scorpio Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी भरभराटीचा; घडणार मोठे चांगले बदल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Scorpio Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्याचा चौथा आठवडा लाभाचा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला नफा मिळेल.
Scorpio Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातला चौथा आठवडा आता सुरु होत आहे. हा नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृश्चिक राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope)
जे लोक बराच काळापासून नातेसंबंधात आहेत, त्यांना अधिक संवादाची आवश्यकता असेल. तुमच्या जोडीदाराच्या गरजा ओळखून घ्या. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. याशिवाय भूतकाळातील गोष्टी उकरुन काढू नका. तुमचे प्रेमसंबंध लग्नापर्यंत नेण्याची संधी शोधा. विवाहित लोक या आठवड्यात गर्भधारणा करू शकतात.
वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career Horoscope)
या राशीच्या लोकांना पहिल्या आठवड्यात नोकरीशी संबंधित काही अडचणी जाणवतील. या आठवड्यात नोकरीच्या मुलाखतीला जाताना आत्मविश्वास बाळगा, तुम्हाला नक्कीच ऑफर लेटर मिळेल. बँकिंग, आयटी, हेल्थकेअर व्यवसायांशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा कठीण असेल. सरकारी काम करणाऱ्यांची एखाद्या वेगळ्या ठिकाणी बदली होऊ शकते. कार्यालयीन राजकारणात पडू नका.
वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संपत्ती आणि भरभराटीचा आहे. पैसा असल्याने तुम्हाला स्मार्ट फायनान्स निर्णय घेण्यात मदत होईल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने तुम्ही कुटुंबासोबत परदेशात जाण्याची योजना कराल. तुम्ही या आठवड्यात स्टॉकमध्ये देखील गुंतवणूक करू शकता, परंतु मोठे निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही एखाद्या तज्ञाची मदत घ्या किंवा शेअर बाजाराचा अभ्यास करा. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतो.
वृश्चिक राशीचे आरोग्य (Scorpio Health Horoscope)
या आठवड्यात तुम्ही हिल स्टेशनवर वैगरे फिरायला जाणं टाळावं. वृद्ध लोकांना छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं आणि पचनाच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. गर्भवती महिलांना साहसी खेळांमध्ये सहभागी न होण्याचा सल्ला दिला जातो. जे लोक तंबाखू किंवा अल्कोहोल सोडण्याचा विचार करत आहेत ते या आठवड्यात असं करू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: