Shani Dev : 2025 मध्ये शनि करणार मीन राशीत प्रवेश; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, पैशांच्या अडचणीही होणार दूर
Shani Gochar 2025 : शनि कुंभ राशीतून निघून 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहे. काही राशींना शनीच्या या संक्रमणाचा खूप फायदा होणार आहे.
![Shani Dev : 2025 मध्ये शनि करणार मीन राशीत प्रवेश; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, पैशांच्या अडचणीही होणार दूर Saturn Transit In Meen These Zodiac Signs Will Get Success Prosperity And Wealth Shani gochar marathi news Shani Dev : 2025 मध्ये शनि करणार मीन राशीत प्रवेश; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, पैशांच्या अडचणीही होणार दूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/ca37960692545543fbc890fbe5baabaa1715836879079466_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Gochar 2025 : कर्मदाता शनि (Shani) विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो. शनि हा नवग्रहातील एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर होतो. काही राशीच्या लोकांच्या जीवनात शनि अशांतता निर्माण करतात, तर अनेकांचं जीवन आनंदाने भरून टाकतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत स्थित आहे आणि मार्च 2025 पर्यंत तो या राशीतच राहील. परंतु 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 वाजता शनि आपली राशी बदलून मीन राशीत प्रवेश करेल. सुमारे अडीच वर्षे शनि या राशीत राहील. अशा स्थितीत अनेक राशीच्या लोकांना साडेसाती आणि धैय्यापासून आराम मिळेल, तर इतर अनेक राशी शनीच्या प्रभावाखाली असतील. शनीच्या गुरूच्या राशीतील प्रवेशामुळे काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं.
शनि 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करेल आणि 3 जून 2027 पर्यंत या राशीत राहील. या काळाच काही राशींना बंपर फायदे मिळतील. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचा मीन राशीत होणारा प्रवेश अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. गेली अनेक वर्षे तुमच्यासाठी कठीण गेली आहेत, पण शनीचा मीन राशीत प्रवेश होताच हळूहळू तुमच्या समस्या संपतील. तुमच्या जीवनात एक नवीन आशा निर्माण होईल. तुम्ही यशाच्या पायऱ्या चढाल. यासोबतच तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल. यामुळे तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष देऊ शकाल. या काळात तुम्हाला काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, जी तुम्ही नीट पार पाडणं आवश्यक आहे, कारण ती तुमच्या करिअरची पायरी ठरू शकते. यासोबतच नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही फायदा होईल. जर तुम्हाला नवीन व्यापार किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही ते या काळात करू शकता. नशीब तुमच्या बाजूने राहील आणि वैवाहिक जीवनातही आनंद राहील.
तूळ रास (Libra)
शनीच्या राशी बदलाचा तूळ राशीच्या लोकांना भरपूर फायदा होईल. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. तुम्ही तुमच्या जीवनात समाधानी असाल. दीर्घकाळ चाललेल्या समस्या आता हळूहळू संपू शकतात. मार्च 2025 नंतर तुमच्या मेहनतीचं आणि संघर्षाचं चांगलं फळ मिळण्यास सुरुवात होईल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल. बुद्धिमत्ता आणि बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहाल, कारण आरोग्यात काही चढ-उतार असतील.
मीन रास (Pisces)
या राशीच्या पहिल्या घरात शनि प्रवेश करेल. ही राशी समृद्धी आणि प्रगती दर्शवते. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुम्हाला जीवनात भरपूर भौतिक सुख मिळेल. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांनाही यश मिळेल. व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. यासोबतच उत्पन्नाचे नवे स्रोतही उघडतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)