Saturday Remedies : शनि दोष दूर करण्यासाठी आज शनिवारच्या दिवशी करा 'हे' उपाय; सर्व संकटं होतील दूर, जीवनाची गाडी येईल रुळावर
Shaniwar Upay : शनिवारच्या दिवशी शनीशी संबंधित उपाय केल्याने शनिदोषापासून आराम मिळतो. या दिवशी केलेले उपाय विशेष फलदायी ठरतात. असं मानलं जातं की, या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात.
![Saturday Remedies : शनि दोष दूर करण्यासाठी आज शनिवारच्या दिवशी करा 'हे' उपाय; सर्व संकटं होतील दूर, जीवनाची गाडी येईल रुळावर Saturday Remedies to remove shani dosh upay know shani mantra shani dev marathi news Saturday Remedies : शनि दोष दूर करण्यासाठी आज शनिवारच्या दिवशी करा 'हे' उपाय; सर्व संकटं होतील दूर, जीवनाची गाडी येईल रुळावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/28/cc65d3b3afccd6d1695417e32056b60e1716914658553466_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Saturday Remedies : आठवड्यातील शनिवारचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. या दिवशी शनीची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख कमी होतं. वैदिक ज्योतिषात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनीला न्याय देवता म्हटलं जातं, कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारावर फळ देतो. शनि हा अत्यंत संथ गतीने फिरणारा ग्रह आहे, त्यामुळे त्याचा वाईट परिणाम देखील व्यक्तीवर दीर्घकाळ राहतो. अशा वेळी, शनिवारी शनीशी संबंधित काही उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
शनिवारी शनीची पूजा का करावी?
शनीच्या शुभ प्रभाव असल्यास माणूस यशाकडे वाटचाल करत राहतो. पण हेच जर, शनि दोष किंवा शनीची साडेसाती मागे लागली तर केलेलं कामही बिघडतं. तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, त्यामुळे शनि दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. या काळात काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात.
शनिदेवाची पूजा पद्धत
शनिदेवाची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं. शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्याच्या मूर्तीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यावेळी त्यांना निळी फुलं, काळे उडीद, काळे कापड, काळे तीळ अर्पण करा. नंतर पुन्हा मोहरीचे तेल अर्पण करा. असं मानलं जातं की, शनिवारी शनिदेवाला गोड पुरी अर्पण करावी, यामुळे तो खूश आहे. यानंतर काळ्या तुळशीची जपमाळ ठेवून 'ॐ शं शनैश्चराय नमः' मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर शनिदेवाची आरती सुरू करून पूजा संपवावी.
शनिवारी करा 'हे' उपाय
शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, यामुळे शनिदोषापासून आराम मिळतो. तसेच शनिदेवाची कृपा अबाधित राहते. दर शनिवारी शनिदेवाच्या मंत्रांचा जप करावा, यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो.
शनिवारी शनि चालिसाचं पठण केल्यास शुभ फळ मिळतं. या दिवशी काळे तीळ, काळी छत्री, मोहरीचे तेल, काळे उडीद आणि शूज आणि चप्पल यांचं दान करावं, यामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि शनिदोषही कमी होऊ लागतात. मान्यतेनुसार, शनिवारी हनुमानजीची पूजा केल्याने देखील शनिदेव प्रसन्न होतात.
शनिदेवाचे मुख्य मंत्र
शनिदेवाची पूजा करताना खालील मंत्रांचा जप करणं शुभ मानलं जातं.
शनि गायत्री मंत्र
ॐ शनैश्चराय विदमहे छायापुत्राय धीमहि ।
शनि बीज मंत्र
ॐ प्रां प्रीं प्रों स: शनैश्चराय नमः ।।
शनि स्तोत्र
ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम ।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ।।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)