एक्स्प्लोर

Saturday Remedies : शनि दोष दूर करण्यासाठी शनिवारी गुपचुप करा 'ही' कामं; सर्व अडचणी होतील दूर, शनि राहील शुभ स्थितीत

Shaniwar Upay : शनिवार हा कर्मदाता आणि न्यायाची देवता शनि महाराजांचा दिवस आहे. शनिवारच्या दिवशी शनीशी संबंधित उपाय केल्याने शनिदोषापासून आराम मिळतो. पण हे उपाय कोणालाही न सांगता गुपचुप करावे.

Saturday Remedies : आठवड्यातील शनिवारचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. या दिवशी शनीची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखं कमी होतात, कामात येणारे अडथळे आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.

वैदिक ज्योतिषात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनीला न्याय देवता म्हटलं जातं, कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारावर फळ देतो. शनि हा अत्यंत संथ गतीने फिरणारा ग्रह आहे, त्यामुळे त्याचा वाईट परिणाम देखील व्यक्तीवर दीर्घकाळ राहतो. अशा वेळी, शनिवारी शनीशी संबंधित काही उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून आराम मिळतो.

शनिवारी शनीची पूजा का करावी?

शनीच्या शुभ प्रभाव असल्यास माणूस यशाकडे वाटचाल करत राहतो. पण हेच जर, शनि दोष किंवा शनीची साडेसाती मागे लागली तर केलेलं कामही बिघडतं. तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, त्यामुळे शनि दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. या काळात काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात.

शनिदेवाची पूजा पद्धत

शनिदेवाची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं. शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्याच्या मूर्तीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यावेळी त्यांना निळी फुलं, काळे उडीद, काळे कापड, काळे तीळ अर्पण करा. नंतर पुन्हा मोहरीचे तेल अर्पण करा. असं मानलं जातं की, शनिवारी शनिदेवाला गोड पुरी अर्पण करावी, यामुळे तो खूश आहे. यानंतर काळ्या तुळशीची जपमाळ ठेवून 'ॐ शं शनैश्चराय नमः' मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर शनिदेवाची आरती सुरू करून पूजा संपवावी.

शनिवारी करा 'हे' उपाय

शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, यामुळे शनिदोषापासून आराम मिळतो. तसेच शनिदेवाची कृपा अबाधित राहते. दर शनिवारी शनिदेवाच्या मंत्रांचा जप करावा, यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो. 

शनिवारी शनि चालिसाचं पठण केल्यास शुभ फळ मिळतं. या दिवशी काळे तीळ, काळी छत्री, मोहरीचे तेल, काळे उडीद आणि शूज आणि चप्पल यांचं दान करावं, यामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि शनिदोषही कमी होऊ लागतात. मान्यतेनुसार, शनिवारी हनुमानजीची पूजा केल्याने देखील शनिदेव प्रसन्न होतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Salt Upay : चिमुटभर मीठ बदलेल तुमचं नशीब; ना आर्थिक तंगी, ना जाणवणार कसला ताण, 'हे' उपाय ठरतील फायद्याचे

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Horoscope Today 1 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget