Sarva Pitru Amavasya 2024 : सर्व पितृ अमावस्येला करा 'हे' 5 अचूक उपाय; पितरांची सदैव राहील कृपा, मार्गातील अडथळे होतील कमी
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करण्यात येणारं श्राद्ध, तर्पण आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्व पितृ अमावस्येला पितृ अमावस्या देखील म्हणतात. हिंदू धर्मात ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हा दिवस पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी समर्पित आहे. पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी आजचा दिवस समर्पित आहे. पूर्वजांच्या आत्मेच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केलं जातं. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करण्यात येणारं श्राद्ध, तर्पण आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात. हा दिवस पूर्वजांची कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी फार अद्भुत मानला जातो. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात.
1. श्राद्ध आणि पिंडदान
सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि पिंडदानाचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध करावं. तसेच, श्राद्धात पूर्वजांना जल आणि तीळ अर्पित केले जातात. त्याचबरोबर, पिंडदान देखील केलं जातं. यामुळे पिठाचा गोळा बनवून पितरांना तो अर्पण केला जातो. ही प्रक्रिया गंगा नदीच्या काठी किंवा पवित्र जलाशयाच्या जागी केली जाते. पिंडदान आणि श्राद्ध केल्याने पितर संतुष्ट होतात आणि कुटुंबात सुख-शांती नांदते.
2. दान आणि अन्नदान
सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना आणि गरजूंना दान केल्याने पितर प्रसन्न होतात. अन्नदान, वस्त्रदान , तीळदान आणि भोजनदान करणं अत्यंत पुण्याचं मानलं जातं. विशेषत: काळे तीळ, उडीद, लोखंडाच्या वस्तू आणि शिजलेल्या अन्नाचं दान करणं शुभदायी मानलं जातं. तसेच, या दिवशी गाय, कुत्रा, कावळा यांना भोजनदान देणं देखील शुभकारक मानलं जातं. आणि त्यांचा आशीर्वादाने जीवनात सुख-समृद्धी मिळते.
3. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय
सर्वपितृ अमावस्येला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही विशेष उपाय केले जातात. या दिवशी भगवान विष्णू तसेच भगवान शंकराची आराधना केली जाते. विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद्भागवत गीता पाठ आणि महामृत्यूंजयाचा जप केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्या पितरांना शांती मिळते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी चढवून तीन वेळा परिक्रमा करावी.
4. खीर आणि फळांचा नैवेद्य
पितरांना प्रसन्न करण्यासाठी सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी खीर, तांदूळ आणि तिळांपासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे घराच्या अंगणात किंवा गच्चीवर कावळ्यांना खाऊ घालणं फार शुभ मानलं जातं.
5. पितरांच्या नावावर दीपदान
या दिवशी संध्याकाळच्या वेळी घराच्या अंगणात तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावून पितरांचं स्मरण करावं. दीप लावल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते प्रसन्न होऊन पितरांना आशीर्वाद देतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :