Sagittarius Weekly Horoscope 29 April To 5 May 2024 : विचारपूर्वक निर्णय घ्या, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, अन्यथा...धनु राशीचा 'असा' असेल आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य
Sagittarius Weekly Horoscope 29 April To 5 May 2024 : धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Sagittarius Weekly Horoscope 29 April To 5 May 2024 : धनु राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा असेल. तुमच्या जीवनात अनेक चांगल्या संधी धावून येतील, परंतु तुम्ही वेळेत त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी हा आठवडा योग्य असेल. एकूणच धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु राशीचे लव्ह लाईफ (Sagittarius Love Life Horoscope)
नवीन आठवड्यात तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असणार आहे. नात्यात गोडवा टिकून राहील. तसेच, जोडीदाराबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला तुम्ही भेट देऊ शकता. या आठवड्यात तुमचा कल आध्यात्माकडे जास्त असणार आहे. जे तरूण लग्न करू इच्छितात त्यांना या आठवड्यात चांगली बातमी ऐकायला मिळेल.
धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)
तुमच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा परिणाम तुमच्या कामावर होईल. पण, असं होऊ देऊ नका. तुम्हाला जर कोणाशी गोष्टी शेअर करायच्या असतील तर तुमच्या जवळच्या मित्राशी संवाद साधा. परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार करा. व्यावसायिकांना व्यवसायात प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. व्यावसायिकांनी व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी थोडी वाट पाहावी.
धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असणार आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. तुमच्याविषयी अनेक गोष्टी वरिष्ठांना सांगितल्या जाऊ शकतात. यासाठी सतर्कता दाखवा. तसेच, जर तुमच्याकडून कोणी पैसे मागितले तर लगेच देऊ नका. आधी चौकशी करा मगच पैशांची मदत करा.
धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)
तुमच्या आयुष्यात जे काही उतार-चढाव सुरु आहेत त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. अतिविचार करू नका. तसेच कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. आणि घडलेल्या परिस्थितीबाबत स्वत:ला दोष देऊ नका. यामुळे तुमचं वजन कमी होईल. तसेच, खाल्लेलं अन्न शरीरात नीट पचणारही नाही. यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :