(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sagittarius Horoscope Today 8 May 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक, रखडलेली कामे पूर्ण होतील; वाचा राशीभविष्य
Sagittarius Horoscope Today 8 May 2023 : कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.
Sagittarius Horoscope Today 8 May 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरीत यश मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक समस्या त्रासदायक असू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र देखील भेटू शकतो. ज्याच्यासोबत तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतील. तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी मेहनत घेतील. परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांचीही मदत घ्या. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
अनुभवी लोकांचा सल्ला घ्या
कौटुंबिक जीवनाबद्दल (Family Life) बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. आज तुमच्याकडे चांगला वेळ आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. तसेच, आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. पण, पैशाच्या बाबतीत, अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, धनु राशीच्या लोकांना नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलाच्या बाजूने ज्या काही चिंता होत्या, त्या आज दूर केल्या जातील. मित्रांसोबतच्या संभाषणातून नवीन माहिती मिळेल आणि शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. संध्याकाळी काही आध्यात्मिक लोकांशी भेटीगाठी होतील.
धनु राशीचे आजचे आरोग्य
धनु राशीच्या लोकांना डोकेदुखी किंवा मायग्रेन इत्यादी समस्या असू शकतात. अत्यंत रागाची स्थिती टाळा आणि मन शांत ठेवून काम करा. दररोज सकाळी पश्चिमोत्तनासन करणे तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
धनु राशीसाठी आजचे उपाय
व्यावसायिक प्रगतीसाठी सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करा. नंतर तांब्याच्या भांड्यात थोडे भरून ओम नमः शिवाय असे म्हणत व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :