Sagittarius Horoscope Today 5 May 2023 : आज भाग्य तुमच्याबरोबर असेल, व्यवहार करताना जपून; 'असा' आहे धनु राशीचा आजचा दिवस
Sagittarius Horoscope Today 5 May 2023 : धनु राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे.
Sagittarius Horoscope Today 5 May 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज शिक्षणात (Education) संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या तुमच्या मित्रांपासून दूर राहा. व्यवसायासाठी (Business) परदेश दौऱ्यावर जाण्याचा योग लवकरच येऊ शकतो. व्यवसायात बदलाबाबत चांगली बातमी मिळेल. सहलीला जाण्याचीही शक्यता आहे. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रवासा दरम्यान, नवीन लोकांशी संपर्क होईल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. प्रेमात मतभेद टाळा. अहंकारात बोलू नका. मुलाच्या आरोग्याकडे (Health) लक्ष द्या. तुमचा व्यवसाय चांगला होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. राजकारणात (Politics) यश मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
विचारपूर्वक गुंतवणूक करा
धनु राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. आर्थिक बाबींसाठी वेळ अनुकूल असेल. आपण योग्य रितीने, विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम समोर येतील. आज व्यवसायात हळूहळू प्रगती दिसून येईल. नशिबाची साथ मिळाल्याने अडकलेली बहुतांश कामे आज सहज पूर्ण होतील. या राशीचे नोकरदार लोक आज ऑफिसमध्ये व्यस्त राहतील.
आज संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होईल. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले असतील आणि तुम्हाला मित्रांचाही पूर्ण पाठिंबा मिळेल. दरम्यान, आज तुमची आर्थिक स्थिती धोक्यात आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आधीच वेळ घ्या.
आज धनु राशीचे आरोग्य
धनु राशीचे लोक कामाच्या वेळी काही गोष्टींमुळे मानसिक तणावात राहू शकतात. दररोज सकाळी चालणे आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल.
धनु राशीसाठी आजचे उपाय
मंदिरात किंवा कोणत्याही व्यक्तीला सुके नारळ अर्पण करा आणि संध्याकाळी भगवान शंकराचे ध्यान करा.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :