(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sagittarius Horoscope Today 24 June 2023 : व्यवसायात नफा, नोकरीतही प्रगतीची संधी; 'असा' आहे धनु राशीचा आजचा दिवस
Sagittarius Horoscope Today 24 June 2023 : आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा.
Sagittarius Horoscope Today 24 June 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या (Job) शोधात इकडे-तिकडे जे फिरत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. छोट्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या व्यवसायात नफा मिळेल. कुटुंबातील (Family) सर्व सदस्य एकत्र एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. मुलांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायासाठी अचानक केलेली सहल सकारात्मक परिणाम देईल. आज तुम्ही मोकळ्या वेळेचा सदुपयोग कराल.
आज धनु राशीच्या लोकांना शिक्षण, व्यवस्थापन संबंधित व्यवसायात खूप प्रगती आणि नफा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल. तुमची आर्थिक स्थितीही आज चांगली राहील. नोकरी व्यवसायामुळे तुम्हाला प्रवासही करावा लागू शकतो. आज तुम्ही मनोरंजन आणि भोजनावर जास्त पैसे खर्च कराल. काही शुभ कार्यासाठी योजना देखील तयार केली जाईल, त्यावर देखील पैसे खर्च केले जाऊ शकतात.
धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
तुमचे कौटुंबिक जीवन आज आनंदी असेल. दिवसाची सुरुवात धार्मिक विधी आणि आध्यात्मिक चर्चांनी होऊ शकते. आज तुम्ही मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करा. घरात पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता आहे. दूरवर राहणाऱ्या नातेवाइकाशी बोलून तुमचं मन मोकळं होईल.
धनु राशीच्या लोकांचे आजचे आरोग्य
ज्यांना गुडघ्याचा किंवा पाठीचा काही त्रास आहे, त्यांनी आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. दैनंदिन कामात सावध राहा, अन्यथा दुखापत होऊ शकते.
धनु राशीसाठी आजचे उपाय
भगवान विष्णूची पूजा करा आणि भगवान विष्णूला काळे तीळ अर्पण करा.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :