Sagittarius Horoscope Today 19 October 2023: गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला, आर्थिक व्यवसायात फायदा होईल; धनु राशीचं आजचं राशीभविष्य
Sagittarius Horoscope Today 19 October 2023: धनु राशीला आज व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल. परंतु कुटुंबीयांच्या कृतीसंबंधी काळजी घेणं आवश्यक असणार आहे.
Sagittarius Horoscope Today 19 October 2023: धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) व्यवसायाच्या दृष्टीने चांगला असेल, पण इतर गोष्टींबद्दल बोलायचं झाल्यास आज तुमचा दिवस समस्यांनी भरलेला असेल. जर व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुम्हाला व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल पण व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला काही नवीन काम उघडायचं असेल, नवीन धंदा उघडायचा असेल तर आजची त्यासाठी वेळ योग्य नाही, असं केल्यास आज तुमचं नुकसान होऊ शकतं.
नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस नोकरदारांसाठी चांगला असेल. तुमच्या कामातील हुशारी पाहून आज तुमचे विरोधक मुद्दाम तुमचा हेवा करतील आणि तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल. तुम्हाला तुमच्या मुलांबाबत काही काळजी देखील असू शकते. तुमचं अपूर्ण राहिलेलं काम आज पूर्ण होऊ शकतं. जी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही बरेच दिवस करत होता, ती गोष्ट आज तुम्हाला मिळू शकते.
धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
आज तुमच्या कुटुंबातील सदस्याची प्रकृती थोडीशी बिघडू शकते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि त्यांच्या आहाराचीही काळजी घ्या. जर तुमच्या कुटुंबात काही षडयंत्र चालू असेल, तर त्याचा आज तुम्ही पर्दाफाश करू शकता, यासाठी तुम्हाला खूप विचार करावा आणि शक्कल लढवावी लागेल. तुमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद सुरू असेल तर आज हा वाद नक्कीच मिटू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीला आज तुमच्या मदतीची गरज पडू शकते, त्यांना सहाय्य करा.
धनु राशीचे आजचे आरोग्य
आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर धनु राशीच्या लोकांना आज घसा आणि कंबरदुखी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पैसे आज जास्त खर्च होतील.
धनु राशीसाठी आजचे उपाय
आजचा दिवस चांगला जाण्यासाठी सकाळी 'ओम नमो: भगवते वासुदेवाय' या मंत्राचा 21 वेळा जप नक्की करा.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ पिवळा लाल आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: