Sagittarius Horoscope Today 03 June 2023 : आज धनु राशीच्या कौटुंबिक जीवनात राहील सुख-शांती; वाचा तुमचं राशीभविष्य
Sagittarius Horoscope Today 03 June 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप व्यस्त असेल.
Sagittarius Horoscope Today 03 June 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करा. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज नातेवाईकांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. तिथे थोडा वेळ घालवल्याने तुमच्या मनातील सगळे विचार दूर होतील आणि प्रसन्न वाटेल. भाऊ-बहिणीचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. जोडीदाराबरोबर काही कारणास्तव वाद होईल. पण, तुम्ही अनावश्यक वाद वाढवू नका.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप व्यस्त असेल. आज तुम्हाला ऑफिसमध्ये जास्त काम करावे लागेल, व्यवसायाच्या कामात आजचा दिवस त्रासदायक असू शकतो. कामाच्या बाबतीत, काही अडथळे येऊ शकतात. यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटणार नाही. थकवा जाणवेल. नोकरी व्यवसायात कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बॉसकडून फटकारले जाऊ शकते. काही तांत्रिक बिघाडामुळे तुमचे काम दीर्घकाळ अडकून राहील.
आज कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. परंतु पैशाच्या बाबतीत, तुमच्या अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. धनु राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी राहील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. राजकारणात यश मिळेल.
धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
धनु राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. भावा-बहिणींचं सहकार्य देखील तुमच्यासाठी मोलाचं ठरेल.
धनु राशीचे आजचे आरोग्य
आरोग्य चांगले राहील, पण, तरीही कौटुंबिक बाबतीत काही कारणाने तणाव राहील. बीपीच्या रुग्णांच्या समस्या आणखी वाढू शकतात. ताज्या हवेत काही काळ ध्यान करणे आणि बाहेर फिरणे फायदेशीर ठरेल.
धनु राशीसाठी आजचे उपाय
संकटमोचन हनुमानाची पूजा करून शमीच्या झाडावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :