Jadatva Yog : राहु आणि बुधाच्या युतीमुळे बनतोय 'जडत्व योग'; 'या' राशींनी राहावं सावध, आर्थिक हानीची शक्यता
Jadatva Yog In Kundali: मार्चमध्ये राहु आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे अशुभ जडत्व योग तयार होत आहे, अशा स्थितीत काही राशींना सावध राहावं लागणार आहे.
Jadatva Yog : ज्योतिष शास्त्रानुसार, 2024 मध्ये प्रत्येक ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे अनेक प्रकारचे शुभ योग किंवा अशुभ योग तयार होत आहेत. एकीकडे नवीन वर्षात अनेक राजयोग तयार होत असताना, दुसरीकडे 'जडत्व योग' नावाचा अशुभ योग देखील तयार होत आहे. जडत्व योग हा एक असा योग आहे, ज्यामुळे माणसाची प्रगती खुंटते. बुध आणि राहूचा संयोग झाला की हा योग तयार होतो. नवीन वर्षात मीन राशीमध्ये या दोन्ही ग्रहांचा संयोग होत आहे, त्यामुळे काही राशींच्या समस्या वाढू शकतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धीचा दाता बुध 7 मार्चला सकाळी 9.40 वाजता मीन राशीत प्रवेश करत आहे . जिथे राहु ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे जडत्व योग तयार होत आहे, या काळात काही राशींना सावध राहावं लागणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या बाराव्या घरात जडत्व योग तयार होत आहे. या योगामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात चढ-उतार येतील. तुम्ही योग्य रितीने गोष्टी हाताळण्याचा खूप प्रयत्न कराल, पण त्यात तुम्ही अपयशी ठराल. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही मानसिक तणावाचे शिकार व्हाल आणि तुम्हाला झोप लागणार नाही. तुमचा मित्रांसोबत काही कारणावरुन वाद होऊ शकतो. आर्थिक नुकसान होण्याचीही दाट शक्यता आहे, म्हणून सावधगिरी बाळगा.
वृश्चिक रास (Scorpio)
या राशीच्या पाचव्या भावात जडत्व योग तयार होत आहे, या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर या काळात परिणाम होऊ शकतो. विद्यार्थी परीक्षेत पास झाले तरी त्यांना अपेक्षित गुण मिळणार नाही. वृश्चिक राशीच्या लोकांना मार्च महिन्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. काही कारणामुळे तु्म्हाला तणावाचा सामना करावा लागेल. या काळात विचार करुन खर्च करावा, अन्यथा पैशांची कमतरता जाणवू शकते.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या चढत्या घरात जडत्व योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. कोणतंही काम काही विचार करूनच करा. तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत असाल, आरोग्याची विशेष काळजी घ्या. नोकरदार लोकांनीही थोडं सावध राहणं आवश्यक आहे, कामातील सहकारी तुमच्या विरोधात काही कुरघोडी करू शकतात. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, आताच नोकरी बदलू नका. तुम्हाला कामात थोडं सावध राहावं लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: