Rahu Gochar : 2026 मध्ये राहूची वाढली ताकद! तब्बल 18 वर्षांनी बनला दुर्लभ संयोग; 'या' 4 राशींसाठी पुढचे 100 दिवस भारी
Rahu 2026 : राहू ग्रह 30 डिसेंबर 2025 रोजी 18 अंशावर होता आणि 15 एप्रिल 2026 पर्यंत तो 12 अंशावर असणार आहे.

Rahu 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहूला (Rahu) पापी ग्रह मानतात. हा एक शक्तिशाली आणि रहस्यमयी ग्रह आहे. नवीन वर्षात राहूने संक्रमण केलं आहे. त्यामुळे त्याची ताकद आता दुपटीने वाढली आहे. जेव्हा एखाद्या ग्रहाचा अंश बळ 12 पासून ते 18 डिग्रीच्या मध्ये असतो. तेव्हा ती स्थिती युवावस्थेची असते.
राहू ग्रह 30 डिसेंबर 2025 रोजी 18 डिग्रीवर होता आणि 15 एप्रिल 2026 पर्यंत तो 12 अंशावर असणार आहे. त्यामुळे या 100 दिवसांत राहूचा प्रभाव कोणकोणत्या राशींना भारी पडणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रात राहूला शत्रू ग्रह मानतात. त्यामुळे राहूचा प्रभाव वाढल्याने मेष राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुमच्या धनधान्यात कमतरता येऊ शकते.तसेच, अचानक तुमचा खर्च देखील वाढू शकतो.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. या ग्रहालासुद्धा राहूचा शत्रू ग्रह मानतात. त्यामुळे या काळात तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम हाती न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, तुमच्यावर कर्जाचा डोंगर चढू शकतो. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, जवळच्या लोकांकडून तुम्हाला धोका मिळू शकतो.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य देव आहे. हासुद्धा राहूचा शत्रू ग्रह आहे. तसेच, या काळात वाहन चालवताना काळजी घ्या. खर्चाच्या बाबतीत तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तुमचा आत्मविश्वास कमी पडू शकतो. तसेच, करिअरमध्ये मोठे बदल येऊ शकतात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात तुम्हाला अनेक कठीण परिस्थितीतून जावं लागू शकतं. तसेच, तुमचा सतत अपमान होऊ शकतो. त्यामुळे या काळात जास्त रिअॅक्ट होऊ नका. अपमान सहन करण्याची ताकद ठेवा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















