Premanand Maharaj: खरंच जादूटोण्यात नशीब बदलण्याची ताकद असते का? प्रेमानंद महाराजांकडून सत्य जाणून घ्या..
Premanand Maharaj: अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, जादूटोण्यामुळे एखाद्याचे वाईट होते किंवा स्वतःला आनंद मिळतो. पण खरंच जादूटोण्यात नशीब बदलण्याची ताकद असते का? प्रेमानंद महाराज म्हणतात...
Premanand Maharaj: ते म्हणतात ना, या देव आहेत तसे दानवही आहेत. तसाच चांगुलपणा आहे, तर वाईटपणाही आहे, आणि पूजा असेल तर जादूटोणा किंवा काळी जादूही अस्तित्वात आहे, अशी मान्यता आहे. एकदा प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने एक प्रश्न विचारला, तो म्हणाला, या जगात खरंच जादूटोणा आहे का? आणि यामुळे एखाद्याचे नशीब खरंच बदलू शकते? तेव्हा या शक्तीबद्दल प्रेमानंद महाराजांनी काय सांगितले ते जाणून घ्या...
जादूटोण्यात नशीब बदलण्याची ताकद असते का? प्रेमानंद म्हणतात..
भक्ताच्या या प्रश्नावर प्रेमानंद महाराज म्हणतात, आयुष्यात जेव्हा काहीच योग्य आणि सकारात्मक घडत नाही, तेव्हा अनेकांना वाटते की, कोणीतरी आपल्यावर जादूटोणा केला आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. आपल्याला असे वाटते की कोणीतरी काहीतरी करणी किंवा काळी जादू केली आहे. परंतु हा सर्व आपल्या कर्माचा परिणाम आहे. जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते, तेव्हा आपले मन आपल्याला काहीतरी वेगळेच सांगत असते,. मग आपण इतरांना दोष देऊ लागतो, पण प्रत्यक्षात पाहता हे आपल्याच कर्माचे भोग आहेत. असे महाराज म्हणतात.
'वाईट कर्माचे ओझे कोणत्या ना कोणत्या रूपाने भोगावेच लागते'
प्रेमानंद महाराज म्हणतात... आपल्या वाईट कर्माचे ओझे आपल्यावर पडले, तर आपल्याला ते कोणत्या ना कोणत्या रूपाने भोगावेच लागते. काही घटना अशा घडतात, तेव्हा आजार होतात किंवा आपले मन विचलित होते. हे सर्व आपल्याच कृतीचे परिणाम आहे. आपण स्मशानभूमीत असो किंवा इतर कुठेही असो, आपली चांगली कृत्ये आपल्याला प्रत्येक परिस्थितीत वाचवतात. पण कर्म वाईट असेल तर प्रत्येक पायरीवर अडचणी येतात.
जादूटोण्याची भीती कशी टाळायची?
प्रेमानंद महाराज म्हणतात... भजन आणि देवाचे नामस्मरण केल्याने आपल्याला या समस्यांपासून स्वत:ला वाचवता येतं. जेव्हा आपण देवाचे ध्यान करतो, तेव्हा कोणतीही वाईट शक्ती किंवा जादूटोणा आपल्याजवळ येऊ शकत नाही. हनुमान चालिसामध्येही लिहिलंय की, "महावीराचे नाव ऐकल्यावर भूत आणि पिशाच्च जवळ येत नाहीत." म्हणजेच जेव्हा आपण भगवंताचे नाव घेतो, तेव्हा कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्यापासून दूर राहते.
भगवंताचे नाव घ्या...
वैयक्तिक अनुभव असेही सांगतो की, आपल्या घरात भगवंताचे नाव घेतले, तर कोणतीही वाईट शक्ती तिथे प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे दररोज देवाची पूजा करा आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा. जेव्हा आपण भक्तीमध्ये लीन होतो, तेव्हा केवळ भूत आणि जादूटोणा दूर राहत नाही. तर आपले मन देखील शांत आणि प्रसन्न होते.
जेव्हा आपल्यावर कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा संकट येते...
प्रेमानंद महाराज म्हणतात, आपण हे समजून घेतले पाहिजे की, जेव्हा आपल्यावर कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा संकट येते तेव्हा त्याचे मूळ कारण आपले कर्मच असते. जर आपण आपली कर्म सुधारले. देवाच्या चरणी लीन झालो. भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले तर कोणतीही वाईट शक्ती आपले नुकसान करू शकत नाही. म्हणून, न घाबरता भगवंताचे स्मरण करा आणि सर्व प्रकारच्या चिंता आणि त्रास विसरून जा. भजन आणि भगवंताच्या नामाचा जप ही एकमेव शक्ती आहे, जी आपल्याला कोणत्याही वाईट परिस्थितीतून वाचवू शकते.
हेही वाचा>>>
Garud Puran: मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा कुटुंबात का भटकत असतो? आत्मा यावेळी काय विचार करतो? गरुड पुराणात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )