January Grah Gochar 2024 : वर्षाच्या सुरुवातीलाच 'हे' मोठे ग्रह करणार मार्गक्रमण; वर्षभरात 'या' राशीचे लोक होणार मालामाल
Grah Gochar 2024 In January: ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याला काही ग्रह आपलं स्थान बदलतात आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतात. जानेवारी 2024 मध्ये देखील काही मोठे ग्रह मार्गक्रमण करणार आहेत, हा काळ काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Planet Transit 2024 In January : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याला एका विशिष्ट वेळी काही ग्रह (Planet) त्यांचं स्थान बदलतात आणि त्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर होतो. येत्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, म्हणजेच जानेवारी 2024 मध्येही अनेक मोठे ग्रह मार्गक्रमण करणार आहेत. जानेवारीत सूर्य, शुक्र आणि बुध ग्रह आपली राशी बदलणार आहेत. अशा परिस्थितीत, या ग्रहांच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ, तर काही लोकांच्या जीवनावर अशुभ परिणाम होतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सूर्याचं मकर राशीत मार्गक्रमण
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य दर 30 दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि याचा सर्व राशींवर परिणाम होतो. जानेवारी 2024 मध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. 15 जानेवारी 2024 रोजी जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाईल.
15 जानेवारी रोजी पहाटे 2:54 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशामुळे काही राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील, यामध्ये मेष आणि कुंभ राशीच्या लोकांचा समावेश आहे. या काळात या राशीच्या लोकांचं नशीब उजळेल. यासोबतच वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांचा समावेश होतो.
शुक्राचं धनु राशीत मार्गक्रमण
नवीन वर्षात शुक्र देखील आपल्या निश्चित वेळेवर धनु राशीत प्रवेश करणार आहे, त्याचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल. 18 जानेवारी रोजी रात्री 8:56 वाजता शुक्र वृश्चिक राशीतून निघून धनु राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत शुक्राचं हे संक्रमण 3 राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये मेष, वृषभ आणि कर्क राशीचा समावेश आहे. शुक्र ग्रहाला आनंद, सौंदर्य, संतती, समृद्धी आणि सामाजिक संबंधांचे प्रतीक मानले जाते.
बुध करणार वृश्चिक राशीत प्रवेश
प्रत्येक ग्रह वेळोवेळी पुढे आणि मागे सरकतो, त्याचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर तसेच देश आणि जगावर दिसून येतो. ग्रहांचा राजकुमार बुध 2 जानेवारीला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत 3 राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















