एक्स्प्लोर

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची 2024 ची भविष्यवाणी! तुमच्यासाठी आनंदाची बातमी, भयंकर आजारांबद्दल केलं भाकीत

2024 Predictions Baba Vanga : वर्ष 2024 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत, यातच आता येत्या वर्षाबद्दलच्या काही भविष्यवाणी चर्चेत येत आहेत. प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा यांनी मेडिकल क्षेत्राबद्दल एक चांगली भविष्यवाणी केली आहे.

Baba Vanga Prediction : जगात असे बरेच महान भविष्यकार आहेत, ज्यांनी येणाऱ्या अनेक दशकांची भविष्यवाणी (Prediction) केली आहे. यातील बऱ्याच भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या देखील झाल्या आहेत. 2024 वर्षाबद्दल देखील अशा अनेक भविष्यवाण्या केल्या गेल्या आहेत, यातील अनेक भविष्यवाण्या घाबरवणाऱ्या आहेत. कारण त्या विनाश, युद्ध, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट इत्यादींशी संबंधित आहेत. पण यातील एक भविष्यवाणी खूप आनंददायी आहे आणि ती खरी ठरली तर ती मानव जातीसाठी मोठी देणगी ठरणार आहे. 

बाबा वेंगा यांनी 2024 साठी केलं महत्त्वाचं भाकीत

बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी 2024 बद्दलचं हे आनंददायी भाकीत  अनेक वर्षांपूर्वी केलं होतं. बाबा वेंगा हे एक महान भविष्यकार आहेत, त्यांनी दशकांपूर्वी केलेली अनेक भाकितं आत्तापर्यंत खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांनी 2024 साठी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाणींपैकी एक वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. बाबा वेंगांच्या म्हणण्यानुसार, कॅन्सर आणि अल्झायमरसारख्या धोकादायक आजारांवर 2024 साली उपचार मिळू शकतात. आतापर्यंत या आजारांवर उपचार करणं अशक्य होतं आणि दरवर्षी केवळ देशातच नव्हे, तर जगभरात लाखो-करोडो लोक या आजारांना बळी पडतात. परंतु आता बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरल्यास मानवाला मोठा फायदा होईल. 

2024 ची भयावह भविष्यवाणी 

बाबा वेंगा यांनी 2024 या वर्षासाठी अनेक धोकादायक भविष्यवाण्या केल्या आहेत, ज्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या, ग्लोबल वार्मिंग, जैविक शस्त्रांचा वापर, सायबर अटॅक यांचा समावेश आहे. याशिवाय बाबा वेंगाच्या मते, 2024 मध्ये जगाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

कोण आहेत बाबा वेंगा?

बाबा वेंगा यांची 'बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस' अशी ओळख आहे. 3 ऑक्टोबर 1911 रोजी बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची वयाच्या बाराव्या वर्षी एका रहस्यमय वादळात दृष्टी गेली. यानंतर त्यांनी जगातील विविध देश, सामाजिक-आर्थिक आणि जागतिक घडामोडीबाबत अनेक भाकितं केली, जी नंतर खरी ठरली. त्यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या पुढे खऱ्या ठरल्या.

टीप : बल्गेरियातील बाबा वेंगा यांची भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. या भविष्यवाणीचं एबीपी माझा समर्थन करत नाही.

हेही वाचा:

Shani Dev : 2024 मध्ये शनि बदलणार नाही चाल; 'या' 5 राशींच्या लोकांना होणार धनलाभ, संकटं होतील दूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Shaktipeeth : शक्तिपीठ महामार्ग का गरजेचा? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं!Dada Khindkar: Dhananjay Deshmukh यांच्या साडूकडून युवकाला अमानुष मारहाण,VIDEO सोशल मिडियावर व्हायरलKrishna Andhale Nashik : संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशकात? CCTVSuresh Dhas On Satish Bhosale : सतीश भोसलेला अटक झाली ही चांगली बाब : सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांनी हत्येच्या आदल्या दिवशी बायकोला काय सांगितलं होतं? समोर आली महत्त्वाची माहिती
संतोष देशमुखांनी हत्येच्या आदल्या दिवशी बायकोला काय सांगितलं होतं? समोर आली महत्त्वाची माहिती
Shaktipeeth Expressway : शेती वाचवा, देश वाचवा! शक्तिपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात एल्गार; हजारो शेतकरी एकवटले
शेती वाचवा, देश वाचवा! शक्तिपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात एल्गार; हजारो शेतकरी एकवटले
Star Pravah Parivar Puraskar 2024: हॅलो अशोक, मी आकाशातून जमिनीवरचा तारा बघतोय; लक्ष्मीकांत बेर्डेंचा अशोक सराफांना आभासी फोन
हॅलो अशोक, मी आकाशातून जमिनीवरचा तारा बघतोय; लक्ष्याचा लाडक्या अशोकला आभासी फोन
Embed widget