Pitru Paksha 2025: पितृपक्षात मृत व्यक्तीचे फोटो 'या' दिशेलाच लावा, पूर्वजांचा आशीर्वाद असेल, चुकीच्या दिशेला लावले असतील तर, आताच काढा, शास्त्रात म्हटलंय..
Pitru Paksha 2025: धार्मिक श्रद्धेनुसार, पितृपक्षात पूर्वज पृथ्वीवर राहतात. या काळात लोक आपल्या पूर्वजांचे तर्पण, श्राद्ध कर्म आणि पिंडदान करतात.

Pitru Paksha 2025: सध्या पितृपक्ष सुरू आहे, हिंदू धर्मात पितरांना देखील मोठे स्थान आहे. असे मानले जाते की, त्यांचे आशीर्वाद जर असतील तर जीवनातील सर्व समस्या दूर होतात. हा काळ पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध कर्म आणि पिंडदान केले जाते. या दरम्यान पूर्वजांचे फोटो लावून त्यांची पूजा केली जाते. मात्र अशा वेळी फोटोच्या दिशेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. वास्तुशास्त्रात पूर्वजांचे फोटो योग्य दिशेला लावल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. मात्र पूर्वजांचे फोटो नेमके कोणत्या दिशेला लावावे, हे अनेकांना माहित नसते. ते जाणून घ्या.
पूर्वजांचे चित्र चुकीच्या दिशेने लावल्याने...
वैदिक दिनदर्शिकेनुसार, पितृपक्ष आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो, जो अमावस्येला संपतो. धार्मिक श्रद्धेनुसार, पितृपक्षात पूर्वज पृथ्वीवर राहतात. या काळात लोक पूर्वजांचे तर्पण, श्राद्ध कर्म आणि पिंडदान करतात. असे मानले जाते की, या गोष्टी केल्याने व्यक्तीला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी राहते. वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे चित्र चुकीच्या दिशेने लावल्याने जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि पूर्वजांना राग येऊ शकतो. अशा परिस्थितीत, पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेने लावावे हे जाणून घेऊया
पितृपक्ष संपताच नवरात्री सुरू
वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावेळी पितृपक्ष 8 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे, जो 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी संपेल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू होईल.
'या' दिशेला पूर्वजांचे चित्र लावू नका
वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये आणि स्वयंपाकघरात चुकूनही पूर्वजांचे चित्र लावू नये. असे मानले जाते की, या ठिकाणी पूर्वजांचे चित्र लावल्याने पूर्वजांना राग येऊ शकतो आणि व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडथळे येऊ शकतात. म्हणून, या ठिकाणी कधीही पूर्वजांचे फोटो लावू नका.
या दिशेने ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, पितृपक्षात पूर्वजांचे चित्र लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वोत्तम मानली जाते. कारण ही दिशा पूर्वजांची मानली जाते. असे मानले जाते की, या दिशेला चित्र लावल्याने पूर्वजांचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतो आणि जीवनातील दुःख आणि संकटे दूर होतात आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. जीवनात शुभ फल प्राप्त होतात.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Sign: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचे नशीब पालटणारे! जबरदस्त बुधादित्य राजयोग बनतोय, इच्छा पूर्ण होणार, बक्कळ पैसा हाती
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















