Pitru Paksha 2022 : आज आहे पितृपक्षातील तृतीया तिथीचे श्राद्ध; जाणून घ्या मुहूर्त आणि विधी
Pitru Paksha 2022 Tritiya Tithi Shradha : पितृपक्षातील तृतीया श्राद्धासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते जाणून घ्या.
Pitru Paksha 2022 Tritiya Tithi Shradha : हिंदू धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2022) विशेष महत्त्व आहे. 10 सप्टेंबरला पितृपक्ष सुरु झाले. याच पितृ पक्षाच्या तृतीया तिथीचे श्राद्ध आज (12 सप्टेंबर) आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षातील तृतीया श्राद्धासाठी तिथीचा मुहूर्त काय आणि श्राद्धासाठी कोणते साहित्य लागते. ते जाणून घ्या.
अश्विन कृष्ण तिसरी तिथी सुरूवात : 12 सप्टेंबर 2022, सकाळी 11.35 पासून
अश्विन कृष्ण तिसरी तिथी समाप्त : 13 सप्टेंबर 2022, सकाळी 10.37 पर्यंत
पितृ पक्ष 2022 तिसरी तिथी श्राद्ध मुहूर्त
कुतुप मुहूर्त : सकाळी 11:58 वाजता ते दुपारी 12:48 पर्यंत
रौहीन मुहूर्त : सकाळी 12:48 वाजता ते दुपारी 01:37 पर्यंत
अपराह्न काळ : सकाळी 01:37 वाजता ते सायंकाळी 04:06 पर्यंत
पितृ पक्ष 2022 श्राद्धसाठी लागणारे साहित्य :
पितृपक्षात या गोष्टींशिवाय श्राद्ध करणे अपूर्ण मानले जाते. श्राद्ध कर्मामध्ये तीळ, कुश, तांदूळ किंवा जव आणि तुळशी असणे फार महत्वाचे आहे.
- कुश : हिंदू धर्मात कुश (एक विशेष प्रकारचे गवत) अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानले जाते. श्राद्ध करताना अनामिकामध्ये कुशापासून बनवलेली अंगठी, ज्याला पवित्री असेही म्हणतात, घालण्याचा नियम आहे. ते धारण करून श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, कुशाच्या पहिल्या भागात ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि मूळ भागात महादेव वास करतात.
- तीळ : बृहन्नार्दीय पुराणानुसार श्राद्ध पक्षात आणि पिंड दानाच्या वेळी तीळ वापरल्याने पितरांना शांती मिळते. मान्यतेनुसार अकाली निधन झालेल्या नातेवाईकांच्या पाण्यात काळे तीळ मिसळून श्राद्ध केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो. धार्मिक ग्रंथानुसार तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या घामापासून झाली आहे. असे मानले जाते.
- तुळशी : तुळशी अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे. तुळशीचा वास पितरांना प्रसन्न करतो आणि त्यांचा आत्मा चिरंतन तृप्त राहतो, असे मानले जाते.
- तांदूळ : पितृ पक्षात तांदळाची खीर बनवण्याची परंपरा आहे. तांदूळ हे संपत्ती आणि शीतलतेचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की तांदळाचे गोळे या हेतूने बनवले जातात की ते पितरांना थंडावा देतात आणि त्यामुळे त्यांचा आत्मा दीर्घकाळ तृप्त होतो. भात नसेल तर जवाचे गोळेही बनवले जातात. जव हे सोन्यासारखे शुद्ध मानले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या :