Numerology : नवीन आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांचं नशीब पालटणार; आर्थिक स्थिती गाठणार नवी उंची, बाप्पाच्या कृपेने सर्व इच्छा होणार पूर्ण
Weekly Numerology Predictions : सुरू झालेला नवीन आठवडा काही लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. काही जन्मतारखेच्या लोकांना या काळात अनेक गोड बातम्या मिळतील. नेमका कोणासाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल? जाणून घ्या

Weekly Numerology Predictions : अंकशास्त्र (Numerology) हे आपल्या जन्मतारखेवर (Birth Date) अवलंबून असतं. आपण ज्या तारखेला जन्मतो ती तारीख आपलं नशीब ठरवते. प्रत्येक तारखेचा एक मूलांक असतो, ज्यानुसार भविष्य सांगितलं जातं. आजपासून नवा आठवडा सुरू झाला आहे आणि दोन दिवसांत नवा महिना देखील सुरू होईस. 29 एप्रिल ते 5 मे पर्यंत चालणारा हा आठवडा या 3 मूलांकांच्या (Moolank) लोकांसाठी खूप भाग्यवान असेल. कोणत्या जन्मतारखेच्या लोकांचा नवीन आठवडा चांगला जाईल? जाणून घेऊया
मूलांक 1
मूलांक 1 असलेल्या लोकांचा नवीन आठवडा चांगला जाणार आहे. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फायद्याचा ठरेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात तुम्हाला खूप उत्साही वाटेल आणि त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील.
आठवड्याची टीप - 'ओम भास्कराय नमः' या मंत्राचा दररोज 21 वेळा जप करा.
मूलांक 5
मूलांक 5 च्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा ठरेल. कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. या आठवड्यात तुम्ही फिरायला जाऊ शकता. शेअर मार्केटमध्ये तुमची आवड वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. मूलांक 5 च्या लोकांनी आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहावं. तुम्हाला या काळात आईवडिलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
आठवड्याची टीप -'ओम बुधाय नमः' या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा.
मूलांक 8
मूलांक 8 असलेल्या लोकांचा नवीन आठवडा सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. तुमचे आणि तुमच्या प्रियकराचे एकमेकांप्रती प्रेम वाढेल, समंजसपणा वाढेल, ज्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. अभ्यासात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमची प्रदीर्घ प्रलंबित आणि अपूर्ण कामं पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. तुमचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
आठवड्याची टीप - शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी यज्ञ-हवन करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
