Numerology Today 14 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या अनुकूल; मिळणार पुरेपूर यश
Numerology Today 14 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.
Numerology Today 14 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप भाग्यवान आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. आर्थिक जीवनात काहीसा गोंधळ राहील. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 असलेल्या लोकांच्या आयुष्यात आज अनेक बदल घडणार आहेत. लव्ह लाईफ असो किंवा करिअर लाईफ असो, आर्थिक परिस्थिती असो किंवा आरोग्याशी संबंधित गोष्ट असो, आज तुम्हाला अनेक बदलांना सामोरं जावं लागेल. जिथे आव्हाने असतील तिथे आज लाभ होण्याचीही शक्यता आहे.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांच्या जीवनात आज अशांतता येईल. पैसे येतील पण खर्चही वाढतील. अतिशय काळजीपूर्वक खर्च करा. तब्येत बिघडू शकते. अडचणींचा सामना करण्यासाठी मित्र आणि प्रियजनांचा आधार घ्या. ऑफिसमध्ये काम करत असताना, मध्येच ब्रेक घ्यायला विसरू नका.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. या ऊर्जेचा योग्य वापर करा. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांनी एकमेकांसोबत वेळ घालवण्याचे नवीन मार्ग शोधले पाहिजेत. जंक फूड टाळा. घाईघाईत निर्णय घेणे टाळा.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या लोकांचा दिवस तणावपूर्ण जाईल. कामाचा जास्त ताण घेऊ नका. लक्षात ठेवा, तुमचे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्ही महत्त्वाचे आहेत. तणाव दूर करण्यासाठी आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ द्या. मित्र आणि जोडीदारासोबत भावना शेअर करणे चांगले राहील.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 च्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एखादे मोठे काम मिळू शकते, ज्यामुळे पदोन्नतीही होऊ शकते. तुमची जीवनशैली निरोगी ठेवा. विवाहितांनी ऑफिस रोमान्स टाळावा.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असणार आहे. आज तुमचा पार्टनर तुम्हाला डिनर डेट किंवा गिफ्ट देऊन सरप्राईज करू शकतो. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. करिअरमध्ये चढ-उतार येतील.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेल्या लोकांचा दिवस चढ-उताराचा असेल. अत्यंत सावधगिरीने ऑफिसमध्ये काम करा. आज तुम्ही कार्यालयीन राजकारणात अडकू शकता. तुमचा मूड सुधारण्यासाठी आज तुमचे आवडते पदार्थ खा.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. अविवाहित लोकांच्या जीवनात रोमांचक बदल घडू शकतात. तुमचा क्रश आज तुमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलेल. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. करिअरचे निर्णय घेताना मुत्सद्दी दृष्टिकोनाचा अवलंब करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :