Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक असतात 'ओव्हरथिंकर'; विचार करुन करुन डोक्याचा करतात भुगा, इतरांनाही यांचा मनस्ताप
Numerology Of Mulank 6 : अंकज्योतिष शास्त्राप्रमाणे, कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे.

Numerology Of Mulank 6 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राशींप्रमाणेच अंकशास्त्रालाही (Ank Shastra) विशेष महत्त्व आहे. अंकज्योतिष शास्त्राप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीचा एक विशेष मूलांक असतो. या मूलांकावरुन (Mulank) व्यक्तीची जन्मतारीख ठरते. तसेच, अंकशास्त्रानुसार, आपल्याला व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यास, त्याच्या आवडी निवडी ओळखण्यास मदत होते. त्यानुसार, आज आपण मूलांक 6 विषयी जाणून घेऊयात.
अंकज्योतिष शास्त्राप्रमाणे, कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह हा सौंदर्य, लग्जरी, आकर्षण आणि भौतिक सुख सुविधांचा कारक मानतात. या ठिकाणी मूलांक 6 चा स्वभाव नेमका कसा असतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कसा असतो स्वभाव?
अंकशास्त्राप्रमाणे, या जन्मतारखेचे लोक फार ओव्हरथिंकर असतात. ओव्हरथिंकर म्हणजे कोणत्याही गोष्टीबाबत अति जास्त विचार करणे. कोणत्याही गोष्टीबाबत हे लोक फार जास्त विचार करतात. कधी कधी तर जास्त विचारांमुळे यांना स्वत:लाही त्रास होतो. तसेच, यांच्या या सवयीचा परिणाम इतरांवरही पाहायला मिळतो.
फार गोंधळलेले असतात
या जन्मतारखेच्या लोकांची सतत विचार करण्याची सवय असल्यामुळे हे लोक फार गोंधळलेले असतात. आणि कोणत्याच निर्णयावर ते ठाम राहात नाहीत. यामुळे यांचं अनेकदा नुकसान होतं. त्यामुळे यांच्यात आत्मविश्वासाची देखील कमतरता पाहायला मिळते. यासाठीच यांच्या आयुष्यात यश फार उशिराने येतं.
कसं असतं आयुष्य?
या जन्मतारखेच्या लोकांचं आयुष्य तसं फार चांगलं असतं. स्वत:च्या मेहनतीने हे पैसा कमावतात. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहात नाहीत. तसेच, हे लोक जिथेही जातात तिथे आपली ओळख निर्माण करतात. देवाच्या कृपेने यांची आर्थिक स्थितीही चांगली असते. मात्र, ही स्थिती हळुहळू सुधारते.
देवी लक्ष्मीची असते विशेष कृपा
मूलांक 6 च्या लोकांचं आर्थिक जीवनही चांगलं असतं. देवी लक्ष्मीची यांच्यावर विशेष कृपा असते. अनेकदा या जन्मतारखेच्या लोकांना आयुष्यात पैसा फार उशिरा मिळतो. मात्र, एकदा यांचं आयुष्य स्थिर झाल्यानंतर यांच्या आयुष्यात यश, पैसा आणि स्वातंत्र्य या तिन्ही गोष्टी टिकून राहतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















