Numerology : स्वभावाने चतुर तरीही मिळतं खरं प्रेम, नशिबाचे धनी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; देवाचे सर्वात लाडकेही असतात
Numerology Of Mulank 5 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5,14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे.

Numerology Of Mulank 5 : ज्योतिष शास्त्रानुसार, ज्याप्रमाणे राशींना महत्त्व आहे. तसंच, व्यक्तीच्या जन्मतारखेलाही तितकंच महत्त्व आहे. अंकज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचं (Mulank) वेगळं असं महत्त्व असतं. अंकशास्त्रात (Ank Shastra) व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक काढला जातो. आणि व्यक्तीच्या मूलांकानुसार त्याचा स्वभाव, माणसाच्या आवडी-निवडी कळतात. या ठिकाणी आपण मूलांक 5 च्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असतो स्वभाव?
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5,14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह हा बुद्धी, व्यवसाय, ज्ञान, तर्क आणि सुखाचा कारक ग्रह मानला जातो. त्यानुसार, या जन्मतारखेचे लोक फार निडर स्वभावाचे असतात. हे लोक आपल्या अंदाजाने जगणारे असतात.
या जन्मतारखेचे लोक रोजच्या जीवनात फार व्यस्त असतात. तसेच, यांच्यामध्ये अनेक कलागुण असतात. आपल्या स्वकर्तृत्वाबरोबरच हे लोक नशिबाचे धनी असतात. यामुळेच यांची ओळख इतरांपेक्षा वेगळी ठरते.
मूलांक 5 असणारे लोक एका जागी कधीच टिकत नाहीत. यांचं मन नेहमी चंचल असतं. तसेच, यांना फिरायला फार आवडतं. या जन्मतारखेच्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि तिथले अनुभव घ्यायला फार आवडतं.
आपल्या बोलण्याने इतरांना प्रभावित करतात
या जन्मतारखेच्या लोकांचं संवादकौशल्य देखील अप्रतिम असतं. अनेकदा हे लोक आपल्या बोलण्याने इतरांना प्रेरित करतात. इतकंच नव्हे तर, या जन्मतारखेचे लोक फार बोलक्या स्वभावाचे असतात. याचा कधी कधी त्यांना त्रासही होऊ शकतो.
चंचल स्वभाव
या जन्मतारखेचे लोक कोणत्याही गोष्टीचा अति जास्त विचार करतात. थोडक्यात यांचा स्वभाव फार चंचल असतो. यांच्या डोक्यात सतत काहीतरी सुरु असतं. यामुळेच अनेकदा यांचा यांच्या मनावर ताबा राहत नाही. या जन्मतारखेचे लोक कधीच एका निर्णयावर ठाम राहात नाहीत. यांच्या मनात नेहमीच द्वंद्व विचार सुरु असतात.
हेही वाचा :




















