Numerology : अति आत्मविश्वासू असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना प्रभावित करणं यांना चांगलंच जमतं, नोकरी-व्यवसायातही चालतं डोकं
Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात, त्यांच्या बोलण्याने ते कोणालाही प्रभावित करू शकतात.
Numerology Of Mulank 5 : अंकशास्त्रात प्रत्येक जन्मतारखेला जन्मलेल्या व्यक्तीशी संबंधित विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन (Numerology) त्या व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात. तर आज आपण मूलांक 5 असलेल्या व्यक्तींबद्दल जाणून घेऊया.
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 5 असते. 5 या मुलांकाचा स्वामी बुध आहे. 5, 14 किंवा 23 जन्मतारखेला जन्मलेले व्यक्ती खूप हुशार, धाडसी आणि मेहनती असतात. या मूलांकाशी संबंधित काही खास गोष्टी जाणू घेऊया.
आत्मविश्वासाने भरलेले असतात या जन्मतारखेचे लोक
5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात आणि ते कोणत्याही गोष्टीत सहज यश मिळवतात. हे लोक जन्मजात जिज्ञासू असतात आणि नवीन गोष्टी शिकण्याची ओढ त्यांना असते. मूलांक 5 च्या व्यक्तींची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण असते आणि त्यांना गोष्टी लवकर समजतात.आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती करतात.
फिरण्याचे शौकिन असतात हे लोक
मूलांक 5 च्या लोकांना नेहमी कोणत्या न कोणत्या कामात व्यस्त रहायला आवडतं. त्यांना खूप फिरायलाही आवडतं आणि ते एकाच ठिकाणी थांबत नाहीत, सतत प्रवास करत राहतात. मूलांक 5 च्या लोकांची ऊर्जा पातळी खूप जास्त आहे आणि त्यांना थकवा जाणवत नाही.
सहज मित्र बनवणं यांना जमतं
हे लोक अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असतात आणि कोणाशीही सहज मैत्री करतात. त्यांच्यातील गुणांमुळे हे लोक इतरांना त्यांच्याकडे सहज आकर्षित करतात. 5, 14 किंवा 23 जन्मतारखेच्या लोकांना नवीन लोकांना भेटायला आवडतं. हे लोक कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेतात.
जोखीम घेण्यास घाबरत नाहीत
या लोकांची कल्पनाशक्ती अप्रतिम असते. हे लोक कला, संगीत किंवा लेखन यासारख्या क्षेत्रात यशस्वी होतात. हे लोक जोखीम घेण्यास घाबरत नाहीत आणि नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात.
प्रेम प्रकरणात लवकर यश मिळत नाही
मूलांक 5 चे लोक आयुष्यात खूप काही मिळवतात, पण प्रेमसंबंधांच्या बाबतीत ते खूप कमनशिबी असतात. या लोकांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत. छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून ते त्यांच्या जोडीदाराशी वाद घालत राहतात आणि त्यांचं नातं फार काळ टिकत नाही. खऱ्या प्रेमासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: