Numerology : हट्टी आणि संशयी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; गैरसमजुतीने सहज दुरावतात नाती, लाख प्रयत्न केले तरीही...
Numerology Of Mulank 4 : अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे.

Numerology Of Mulank 4 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशींना महत्त्व आहे. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रालाही (Ank Shastra) तितकंच महत्त्व आहे. ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशींनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व ओळखलं जातं. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्या व्यक्तीचा स्वभाव आणि आवड-निवड ओळखली जाते. या ठिकाणी आपण मूलांक 4 बद्दल जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे.
कसा असतो स्वभाव?
अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांवर राहू ग्रहाचा सर्वात जास्त प्रभाव असतो. कारण या लोकांचं व्यक्तिमत्व फार गूढ असतं. या लोकांना आवडत्या गोष्टींची माहिती ठेवायला फार आवडतं. यांच्या याच व्यक्तिमत्त्वामुळे हे लोक इतरांचं लक्ष स्वत:कडे फार लवकर आकर्षून घेतात.
फार हट्टी असतात
या जन्मतारखेचे लोक फार हट्टी स्वभावाचे असतात. या जन्मतारखेच्या लोकांवर सूर्य ग्रहाचा देखील जास्त प्रभाव असतो. त्यामुळेच हे लोक फार साहसी आणि कुशाग्र बुद्धीचे असतात. या लोकांना एखादी गोष्ट आवडली की ती घेतल्याशिवाय हे शांत बसत नाहीत. तसेच, यांच्या हट्टी स्वभावामुळे यांना इतरांबरोबर सामावून घेणंदेखील तसं कठीणच ज
मनमौजी असतात
या जन्मतारखेच्या लोकांना आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगायला फार आवडतं. त्यामुळेच हे लोक मनमौजी आणि मिश्किल स्वभावाचे असतात. कोणत्याही वातावरणात अगदी सहजतेने वावरतात. यांना आपल्या विश्वात रमायला फार आवडतं. त्यामुळेच हे नेहमी अॅडव्हेन्चर ट्रेक करतात. नि
संशयी स्वभाव
या जन्मतारखेच्या लोकांमध्ये सर्व गुण चांगले असतात. मात्र, हे लोक फार संशयी स्वभावाचे असतात. यांच्या या स्वभावामुळे नात्यात अनेक गैरसमज निर्माण होऊन लोक यांच्यापासून दुरावतात. यामुळे यांचे नातेसंबंध अगदी सहजतेने बिघडतात. तसेच, या जन्मतारखेचे लोक प्रेमविवाह करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















