Numerology Of Mulank 4 : शांत, गंभीर आणि रहस्यमय स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; राहू ग्रहाचा असतो सर्वात जास्त प्रभाव
Numerology Of Mulank 4 : ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 4 असतो.

Numerology Of Mulank 4 : वैदिक ज्योतिष शास्त्रात राहू (Rahu) ग्रहाला कठोर वाणी, जुगार, प्रवास, चोरी, दुष्ट कर्म, त्वचारोग आणि धार्मिक यात्रेचा कारक ग्रह मानला जातो. तर, राहू ग्रहाची महादशा एखाद्या व्यक्तीवर पडली तर ती 18 वर्षांपर्यंत चालते. तसेच, राहू ग्रहाचा संबंध 9 अंकाशी जोडला जातो. या ग्रहावर राहू ग्रहाचं आधिपत्य आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 4 (Mulank) असतो.
या जन्मतारखेचे लोक फार कूटनीती करणारे असतात. त्याचबरोबर या मूलांकाचे लोक राजकारणी असतात. या जन्मतारखेचे लोक प्रत्येक कामाच्या मूळाशी जाऊन विचार करतात. तसेच, हे लोक फार रचनात्मक असतात. या जन्मतारखेच्या लोकांविषयी आणखी काही गोष्टी जाणून घेऊयात.
फार मेहनती आणि प्लानिंग करणारे असतात
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 असणारे लोक फार मेहनती आणि व्यावहारिक असतात. कोणतंही काम करण्याआधी हे लोक एक योजना, रणनीती आखतात. तसेच, जोपर्यंत ध्येय संपादन होत नाही तोपर्यंत या जन्मतारखेचे लोक मेहनत घेत असतात. अनेक नवीन गोष्टी जाणून घ्यायला यांना फार आवडतं. तसेच, यांना आपल्या पद्धतीने आयुष्य जगायला आवडतं.
या जन्मतारखेच्या लोकांनी कोणतंही कार्य हाती घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत. या जन्मतारखेचे लोक साहसी, धाडसी आणि व्यवहारात कुशल असतात.
रहस्यमयी आणि हट्टी असतात
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा स्वभाव काहीसा हट्टीपण असतो. या लोकांना अनेक गोष्टी स्वत:पर्यंतच मर्यादित ठेवायला आवडतात. आपली पर्सनल स्पेस यांना फार प्रिय असते. तसेच, एखाद्या गोष्टीत आपलं मत मांडल्यानंतर ते त्याच गोष्टीवर ठाम असतात. या जन्मतारखेचे लोक राजकारण, बिझनेस, उद्योजकासारख्या भूमिका अत्यंत चोख बजावतात. गंभीर विषयाबाबत यांना फार माहिती असते. हाच स्वभाव त्यांच्या स्वभावात पण दिसून येतो.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















