Numerology : इमोशनली इंटेलिजेंट आणि प्रामाणिक असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पाहताक्षणीच पडाल यांच्या प्रेमात
Numerology Of Moolank 2 : कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.
Numerology Of Moolank 2 : अंकज्योतिष (Numerology) शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि स्वभावातील विविध गुणांचा अंदाज लावता येतो. व्यक्तीच्या जन्मतारखेच्या संख्येची बेरीज केल्यास व्यक्तीचा मूलांक ठरविता येतो. त्यानुसार आज आपण मूलांक (Mulank) 2 च्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. अंकज्योतिषशास्त्रानुसार, मूलांक 2 च्या व्यक्ती खूप खास असतात. मान्यतेनुसार, मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. मूलांक 2 असलेले व्यक्ती फार शांत, बुद्धिमान आणि भावूक स्वभावाच्या असतात. आणखी या मूलांकाची कोणती वैशिष्ट्ये आहेत ते पाहूयात.
प्रचंड बुद्धिमान असतात
मूलांक 2 असणारे व्यक्ती फार बुद्धिमान आणि समजूतदार असतात. या जन्मतारखेच्या लोकांची लीडरशिप क्वालिटी फार चांगली असते. हे लोक टीमवर्क वर फोकस करतात. समाजात या लोकांना फार मान-सन्मान असतो. लोक यांच्या विचारांना फार प्राधान्य देतात.
तसेच, आपल्या सपोर्टिव स्वभावाने हे लोक फार लवकर इतरांचे चांगले मित्र होतात. आपल्या करिअरसंबंधित ध्येयाला घेऊन हे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात.
लॉयल पार्टनर
मूलांक 2 असणारे व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत फार लकी असतात. तसेच, आपल्या जोडीदाराप्रती फार प्रामाणिक असतात. असे लोक आपल्या जोडीदाराबरोबर कोणत्याच गोष्टी लपवत नाहीत. अनेकदा लोक यांच्या प्रेमाचा आदर्श घेतात. आपल्या जोडीदाराला व्यवहारात पाठिंबा देतात.
या जन्मतारखेचे लोक इतरांच्या भावनांचा आणि निर्णयाचा फार सन्मान करतात. ज्यामुळे यांच्याकडे इतर लोक लगेच आकर्षित होतात.
कधीच हार मानत नाहीत
अंकज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 2 असणारे व्यक्ती फार साहसी आणि पराक्रमी असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांचा अगदी धीटाने हे सामना करतात. तसेच, कठीण प्रसंगात हे कधीच हार मानत नाहीत. यांची जिद्द आणि मेहनत पाहून प्रत्येकजण यांची प्रशंसा करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: