एक्स्प्लोर

Numerology : प्रचंड जिद्दी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हवी ती गोष्ट मिळवूनच राहतात, कुणासमोर झुकणं यांना आवडत नाही

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक जीवनात मोठं यश प्राप्त करतात, ते कधी कुणावर अवलंबून नसतात. त्यांनी एखादी गोष्ट मिळवायची ठरवली तर ती मिळवूनच राहतात.

Numerology Mulank 3 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 3 असलेल्या लोकांचीही काही खास वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.

मूलांक 2 चा शासक ग्रह बृहस्पति आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. 3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेचे लोक स्वतंत्र विचाराचे असतात. हवं ते मिळवण्याची जिद्द त्यांच्यात असते. या मूलांकाचे लोक धैर्यवान, शूर आणि सामर्थ्यवान असतात. मूलांक 3 शी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात हे लोक

मूलांक 3 चे खूप महत्वाकांक्षी असतात, त्यांची मोठी स्वप्नं असतात. त्यांच्या ध्येयाप्रती ते एकनिष्ठ असतात. मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य करण्याची हिंमत त्यांच्यात असते. आपल्या प्रयत्नांच्या जोरावर ते हवं ते सर्व साध्य करतात. या मूलांकाचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड करत नाहीत. यासोबतच मूलांक 3 चे लोक हे धैर्यवान, शूर, संघर्ष करणारे आणि कधीही हार न मानणारे असतात. या जन्मतारखेचे लोक मेहनतीच्या जोरावर ऐषोआरामाचं जीवन जगतात. 

अतिशय जिद्दी असतात या जन्मतारखेचे लोक

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक हे स्वभावाने प्रचंड जिद्दी असतात. त्यांना एखादी गोष्ट हवी असेल तर ते ती मिळवूनच राहतात. जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत यांना शांत बसवत नाही आणि ते अस्वस्थ होतात. त्यांना अपेक्षित गोष्टी घडल्या नाही अथवा मिळाल्या नाही तर त्यांची चिडचिड होते.

कुणासमोर झुकणं यांना आवडत नाही

मूलांक 3 असलेले लोक खूप स्वाभिमानी असतात. या लोकांना कुणासमोर झुकायला आवडत नाही. या मूलांकाच्या लोकांना कोणाचेही उपकार नको असतात किंवा त्यांना त्यांच्या कामात कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप आवडत नाही.

उच्च शिक्षण घेतात

मूलांक 3 असलेले लोक उच्च शिक्षण घेतात. हे लोक खूप अभ्यासू असतात, वाचन आणि लेखनात ते खूप हुशार असतात. या लोकांना विज्ञान आणि साहित्यात प्रचंड रस असतो. हे लोक अभ्यासात यशस्वी होतात. मात्र, या लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. अनेकदा या लोकांना घरून आर्थिक मदत घ्यावी लागते. वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते. 

प्रेमसंबंध टिकत नाही, पण वैवाहिक जीवन राहते आनंदी

या लोकांची मित्रसंख्या मोठी असते. या लोकांचे प्रेमसंबंध टिकत नाहीत, परंतु त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. कधीकधी त्यांची एकापेक्षा जास्त लग्नं होण्याची शक्यता असते. त्यांना त्यांच्या पहिल्या लग्नाचा नेहमीच त्रास होतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : अत्यंत भोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही अगदी सहज जातं यांना फसवून, नंतर करतात पश्चाताप

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्याचे पॉवरफुल संक्रमण नशीब पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्याचे पॉवरफुल संक्रमण नशीब पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget