Numerology Monthly Horoscope : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना ठरणार लकी, मागाल ती इच्छा होणार पूर्ण, 'या' देवाची विशेष कृपा
Numerology Monthly Horoscope August 2024 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतं.
Numerology Monthly Horoscope August 2024 : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. अंक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिना हा वर्षातील आठवा महिना आहे. त्यामुळ मूलांक 8 (Mulank) असणाऱ्या लोकांसाठी हा महिना फार खास असणार आहे. त्यामुळेच वर्षातला आठवा महिना या जन्मतारखेच्या लोकांसाठी फार शुभकारक असणार आहे.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन (Numerology) त्या व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात. तर आज आपण 8 मूलांकाच्या जन्मतारखांबद्दल बोलणार आहेत, या मुलांकाचा स्वामी शनि (Shani) आहे.
ऑगस्ट 2024 च्या 'या' आहेत लकी जन्मतारखा
ज्या लोकांचा जन्म ऑगस्ट महिन्यातील 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे. अशा लोकांसाठी ऑगस्टचा हा महिना फार लकी असणार आहे. या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 8 हा शनीचा मूलांक आहे. शनीला हा अंक फार प्रिय आहे.
'अशी' असते पर्सनालिटी
अंक ज्योतिष शास्त्रात 8 हा सर्वात प्रभावी अंक मानण्यात आला आहे. या अंकाला अनंत चिन्हाप्रमाणे मानलं जातं. या जन्मतारखेला जन्मलेले लोक आयुष्यात यशाची उंची गाठतात.
ज्या लोकांचा जन्म ऑगस्ट महिन्यात होतो असे लोक जन्मत:च स्ट्रॉंग व्यक्तिमत्त्वाचे असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे लोक फार लवकर आकर्षित होतात. यांच्याकडे फार कलागुण, नेतृत्व असतात. तसचे, प्रत्येक कामात हे लोक इतरांपेक्षा पुढे असतात. या लोकांना नशिबाची देखील साथ मिळते.
'या' जन्मतारखेला लोकांसाठी ऑगस्ट महिना लाभदायक
8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फार लाभदायक असणार आहे. या जन्मतारखेच्या लोकांची प्रत्येक इच्छा ऑगस्ट महिन्यात पूर्ण होईल. तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, नोकरीच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. या काळात जोडीदाराबरोबर तुमचं वर्तन चांगलं असेल. तसेच, पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
हे ही वाचा :