एक्स्प्लोर

Numerology: वैवाहिक जीवनात अडचणी! 'या' जन्मतारखांच्या लोकांचं दुसरं लग्न होण्याची शक्यता अधिक? बुध ग्रहाचा मोठा प्रभाव, अंकशास्त्र...

Numerology: अंकशास्त्रानुसार, काही जन्मतारखांच्या लोकांना अनेकदा त्यांच्या पहिल्या लग्नात समस्यांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे दुसरे लग्न होण्याची शक्यता अधिक वाढते.

Numerology: आजकालच्या या जगात नातं शेवटपर्यंत टिकवणं अत्यंत कठीण होऊन बसलंय.. आजकाल घटस्फोटाचं प्रमाण देखील बऱ्यापैकी वाढताना दिसतंय. जोडीदारांना एकमेकांशी जुळवून घेण्यात अनेकदा अडचणी येत असल्याचं दिसत आहे. अंकशास्त्रानुसार आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या वैवाहिक जीवनात अनेकदा अडचणी दिसून येतात, ज्यामुळे काही लोक नव्याने नातं निर्माण करतात, जाणून घेऊया...

'या' जन्मतारखांवर बुध ग्रहाचा मोठा प्रभाव...(Numerology)

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. त्यांची तीक्ष्ण बुद्धी, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि निर्भय स्वभाव इतरांची मने जिंकतो. या अंकाचे लोक आपले जीवन स्वतःच्या पद्धतीने जगतात आणि इतरांशी सहज जुळवून घेतात.

प्रेम आणि वैवाहिक जीवन

अंकशास्त्रानुसार, हे लोक इतरांशी लवकर जुळवून घेतात आणि अनेकदा त्यांच्या खेळकर स्वभावासाठी ओळखले जातात. ते स्वभावाने रोमँटिक असतात आणि कधीकधी विवाहबाह्य संबंधांकडे आकर्षित होतात. अंकशास्त्रानुसार, यापैकी काही लोक ह् स्वच्छंदी स्वभावाचे असतात, त्यामुळे त्यांना अनेकदा त्यांच्या पहिल्या लग्नात समस्यांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे दुसरे लग्न होण्याची शक्यता अधिक वाढते.

स्वातंत्र्य आवडते...कमिटमेंट नको....

अंकशास्त्रानुसार, या लोकांना कोणत्याही गोष्टीसाठी पटकन कमिटेड म्हणजेच वचनबद्ध व्हायला आवडत नाही आणि जरी त्यांनी लग्न केले तरी, नातं शेवटपर्यंत टिकवणे कठीण जातं. त्यांना स्वातंत्र्य आवडते, त्यामुळे ते नात्यांमध्ये मोकळीक शोधतात.

कोणासोबत चांगले जुळवून घेतात?

अंकशास्त्रानुसार, मूलांक 1, 3 आणि 6 असलेले लोक चांगले जोडीदार होऊ शकतात. त्यांचे विचार मूलांक 2 आणि 7 असलेल्या लोकांशी जुळत नाहीत, ज्यामुळे नात्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो.

बंधनात काम करणे आवडत नाही...

अंकशास्त्रानुसार, हे लोक चांगले व्यावसायिक बनतात, कारण ते जोखीम पत्करण्यात आणि लोकांवर प्रभाव टाकण्यात पारंगत असतात. ते मार्केटिंग, माध्यम (मीडिया), विक्री (सेल्स) आणि पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये यशस्वी करिअर करू शकतात. त्यांना स्वतंत्रपणे काम करणे आणि प्रवास करणे आवडते. त्यांना मर्यादित जागेत बंदिस्त राहणे आवडत नाही.

मानसिक तणावाचा त्रास

अंकशास्त्रानुसार, या लोकांना अनेकदा मानसिक तणावाचा त्रास होऊ शकतो. जास्त विचार केल्याने त्यांचे मन लवकर थकते. त्यांच्या आहारातील आणि दैनंदिन दिनचर्येतील अनियमितता हा त्यांचा सर्वात मोठा कमकुवतपणा आहे. बुध ग्रहाचा प्रभाव त्यांच्या मज्जासंस्थेवर पडतो.

हेही वाचा

Shani Jayanti 2026: शनि जयंतीला नशीबाचे फासे पालटणार! 16 मे नंतर 4 राशींच्या संपत्तीचा मार्ग मोकळा, शनिदेवांकडून लाड, अद्भूत योगायोग...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshatra Gochar 2026 : सूर्यग्रहणानंतर शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशींना सोसावं लागणार दु:ख; अचानक होणार धनहानी, प्रचंड नुकसान
सूर्यग्रहणानंतर शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशींना सोसावं लागणार दु:ख; अचानक होणार धनहानी, प्रचंड नुकसान
Shravan 2026: श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Astrology: आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..
आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..
Horoscope Today 13 August 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Embed widget