Numerology: स्वत:च्या चुका कधीच स्वीकारत नाहीत! 'या' जन्मतारखेचे लोक छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
Numerology: अंकशास्त्रानुसार, काही जन्मतारखेच्या लोकांना त्यांच्या चुका कधीच स्वीकारत नाहीत आणि प्रत्येक छोट्या गोष्टीवर भांडत असतात! अंकशास्त्रात म्हटलंय..

Numerology: आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, ज्यांचे विविध स्वभाव आपल्याला पाहायला मिळतात, तसं पाहायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही विशिष्ट गुण किंवा कमतरता असते, या जगात अतिशय वाईट स्वभावाच्या लोकांचीही कमतरता नाही. काही लोक खूप भावनिक, स्पष्टवक्ते, भित्रे, स्वच्छ मनाचे किंवा काळजी घेणारे असले तरी, काही लोक प्रत्येक लहानसहान गोष्टीवर हट्टी असतात, आणि कोणाचेही ऐकत नाही. अंकशास्त्रानुसार आज अशा जन्मतारखेच्या व्यक्तींबद्दल जाणून घेऊया, जे लोक चुका कधीच स्वीकारत नाहीत आणि प्रत्येक छोट्या गोष्टीवर भांडत असतात. अंकशास्त्रात म्हटलंय..
आपल्या चुकांची कधीच माफी मागत नाहीत..
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याच्या जन्मतारखेवरून बरेच काही जाणून घेता येते. त्याचा स्वभावही कळू शकतो. आज आम्ही तुम्हाला त्या जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत, ज्यावर जन्मलेले लोक जिद्दी असतात आणि त्यांच्या चुका कधीच स्वीकारत नाहीत. ते इतरांचे सहज ऐकत नाहीत आणि नेहमी भांडणासाठी तयार असतात. तसं पाहायला गेलं तर तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती तुम्हीही स्वीकारली पाहिजे. पण अंकशास्त्रानुसार, काही लोक असे असतात जे आपल्या चुकांची कधीच माफी मागत नाहीत. उलट, ते त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी सतत भांडतात. जाणून घेऊया त्या तारखांबद्दल ज्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव हट्टी असतो.
या लोकांचा स्वभाव अत्यंत हट्टी!
अंकशास्त्रानुसार 1, 8, 5, 23, 11, 29, 19 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव हट्टी असतो. हे लोक त्यांना जे करायचे तेच करतात. ते कधीही कोणाचे ऐकत नाहीत. याशिवाय ते आपल्या चुकाही मान्य करत नाहीत आणि नेहमी लढण्यासाठी तयार असतात. त्यांच्या कल्याणासाठी त्यांना कोणी काही सांगितले तरी ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकवेळा त्यांना लोकांशी जुळवून घेण्यात अडचणी येतात.
कोणाची हांजी हांजी करत नाही
कोणत्याही महिन्याच्या 1, 10 किंवा 17 तारखेला जन्मलेल्या लोकांचे मन चांगले असते. त्यांच्या मनात जे आहे ते ते सरळ सांगतात. याशिवाय ते कोणाची हांजी हांजी करत नाही. त्यांना कोणाची काही अडचण असेल तर ते तोंडावर स्पष्टपणे सांगतात. याशिवाय हे लोक फसवणूकही करत नाहीत.
हेही वाचा :
May 2025 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचे नशीब 'मे' महिन्यात पालटणार! धनलाभाचे संकेत, मासिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















