Numerology: पुढचे 4 महिने 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी गेमचेंजर! सप्टेंबरपासून स्वप्न पूर्ण होण्याचे योग, मंगळाचे भरभरून आशीर्वाद
Numerology: ऑगस्ट महिना संपत आला आहे. अंकशास्त्रानुसार 2025 वर्षातील पुढचे 4 महिने हे 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. सुख-समृद्धी आणि पैशांची भरभराट होईल..

Numerology: ऑगस्ट महिना संपत आला आहे. आणि सप्टेंबर महिन्याची सुरूवातही लवकरच होतेय. अंकशास्त्रानुसार पाहायला गेल्यास, वर्ष 2025 हे काही जन्मतारखेच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या वर्षी त्यांच्यावर मंगळाचे विशेष आशीर्वाद राहतील, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. अंकशास्त्रानुसार, पुढचे 4 महिने हे कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी खास असणार आहे. जाणून घ्या..
पुढच्या 4 महिन्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांचे स्वप्न पूर्ण होण्याचे योग
अंक ज्योतिष हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याच्या भविष्याबद्दल माहिती देतो. जन्मतारखेपासून काढलेला मूलांक हा त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि नशीब दर्शवतो. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक वर्षाची एक संख्या असते. उदाहरणार्थ, 2024 ची बेरीज म्हणजेच या वर्षाचा मूलांक 8 आहे, त्याचप्रमाणे 2025 चा मूलांक 9 आहे आणि 9 चा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा शक्ती, धैर्य आणि उर्जेचा कारक मानला जातो. अशात, 2025 मध्ये 9 अंक असलेल्या लोकांवर म्हणजेच ज्यांचा जन्म हा 9, 18 तारखेला झाला असेल, त्यांच्यावर मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव पडेल. अशा परिस्थितीत, 2025 वर्ष मूलांक 9 च्या लोकांसाठी खूप फलदायी ठरणार आहे. सविस्तर जाणून घेऊया..
मंगळाचा मोठा प्रभाव...
अंकशास्त्रानुसार, 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये मूलांक 9 असतो. हे लोक खूप मेहनती, दृढनिश्चयी आणि ध्येयवेडे असतात. मंगळाच्या प्रभावामुळे त्यांच्यात नेतृत्व क्षमता देखील असते.
करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी
अंकशास्त्रानुसार, या वर्षी मूलांक 9 च्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. त्यांना पदोन्नती, पगारवाढ आणि नवीन संधी मिळू शकतात. हे वर्ष व्यवसाय करणाऱ्या मूलांक 9 च्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. त्यांना नवीन व्यवहार मिळू शकतात आणि व्यवसाय वाढू शकतो.
भरभराट होणार...!
- मंगळाच्या प्रभावामुळे मूलांक 9 च्या लोकांचे आरोग्य चांगले राहील.
- त्यांना कोणत्याही प्रकारच्या गंभीर आजाराची काळजी करण्याची गरज नाही.
- वैवाहिक जीवनात गोडवा येईल.
- जोडीदाराशी संबंध मजबूत होतील.
- आर्थिक स्थिती सुधारेल.
- पैशाची कमतरता भासणार नाही.
मंगळ देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही 'हे' उपाय करू शकता
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाला शनिदेवाचा मित्र मानले जाते. म्हणून हनुमानजींची पूजा केल्याने मंगळ देव प्रसन्न होतात. मंगळवारी व्रत केल्याने मंगळ देव प्रसन्न होतात. दान केल्याने मंगळ देव देखील प्रसन्न होतात. मंगळाचा रंग लाल आहे. म्हणून लाल रंगाच्या वस्तूंचे दान करणे शुभ आहे.
हेही वाचा :
Gauri Avahana 2025: आज सोनपावलांनी गौरी येणार, सोबत 'या' 5 राशींचे नशीबही उजळणार! घरात सुख, शांती, भरभराट होणार, तुमची रास?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















