Numerology 11 December 2023 : 'या' जन्मतारखेच्या लोकांचा आजचा दिवस शुभ; काहींचा दिवस खर्चिक, जन्मतारखेनुसार पाहा आजचं भविष्य
Numerology 11 December 2023 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.
Numerology 11 December 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
ज्यांचा जन्म 1,10, 19, 28 तारखेचा असतो, त्यांचा मूलांक 1 असतो. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटाल. व्यवसायात इच्छित प्रस्ताव प्राप्त होतील. तुमच्या करिअर किंवा व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. तुम्ही तुमची नाती चांगल्या प्रकारे सांभाळाल. तुमच्या कामात अपेक्षित परिणाम साधाल. वरिष्ठ सहकाऱ्यांना साथ द्या. वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही उत्कृष्ट व्हाल.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. तुमचा आजचा दिवस संपूर्ण प्रगतीचा असेल. तुम्हाला सर्व कामांत यश मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळाल्याने सर्व कामांत सकारात्मक परिणाम मिळेल. नात्यात सुसंवाद वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात मेहनत वाढेल. सर्वांशी चांगलं वर्तन ठेवा, कुटुंबात आनंद राहील.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. आजचा दिवस मूलांक 3 च्या लोकांसाठी भाग्यवान आहे. तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तुमच्या कामाने योग्य जागा तयार करा. प्रियजनांशी भेटीगाठी वाढतील. भावनिक बाबी जपून हाताळा. कुटुंबात सुख-समृद्धी राहील. वैयक्तिक यश वाढतच जाईल. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. तुमचा आज वैयक्तिक बाबींमध्ये उत्साह वाढवेल. कामाच्या ठिकाणावरील विश्वास वाढेल. विश्वास आणि आत्मविश्वासाने ध्येय साध्य होईल. प्रलंबित कामात अडथळे येतील, परंतु प्रयत्न करत राहा. कामात अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. सर्वांशी सहकार्याची वृत्ती ठेवा.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 साठी आजचा दिवस प्रगतीचा आणि आशा टिकवून ठेवणारा आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीच्या संधी वाढतील. तुम्ही तुमचा दृष्टीकोन आत्मविश्वासाने मांडाल. धोरणं आणि नियमांचं पालन करा. यश कायम राहील. मित्रांचं सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांचा विश्वास जिंकाल.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 साठी आजचा दिवस आनंद, समृद्धी वाढवणारा असेल. कामाच्या ठिकाणी व्यावसायिकता राखा. आज तुमची महत्त्वाची कामं वेगाने होतील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मालमत्ता आणि वाहन खरेदीत रस दाखवाल. लाभदायक परिस्थिती कायम राहील. भेटीगाठीच्या संधी वाढतील. कामात सकारात्मकता राहील.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 च्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. व्यवसायात लाभ होईल. व्यावसायिक बाबींना सकारात्मक वळण मिळेल. आदर आणि सन्मान मिळेल. आत्मविश्वास वाढेल. ध्येय गाठण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नातेसंबंध सुधारतील. सर्वांना सोबत घेऊन पुढे जा.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 साठी आजचा दिवस नफा आणि व्यवसाय वाढीसाठी सहाय्यक आहे. व्यावसायिक भागीदाराचं सहकार्य वाढेल. तुमच्या कामात अपेक्षित परिणाम साधाल. वरिष्ठांचा प्रभाव तुमच्यावर राहील. सामंजस्य वाढवण्यावर भर द्या. व्यावसायिक क्षेत्रात प्रभावी राहाल. मित्र आणि कुटुंबीयांचं सहकार्य लाभेल. प्रवासाच्या संधी निर्माण होतील.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. आजचा दिवस व्यवसायासाठी सकारात्मक असेल आणि तुम्ही महत्त्वपूर्ण उद्दिष्टे साध्य कराल. प्रियजनांचा विश्वास जिंकाल. एकूणच सगळीकडून आनंद मिळेल. कामात सक्रियता वाढेल. सकारात्मक आणि उत्साही राहाल. मन प्रसन्न राहील. मानसिक ताण ओढावणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :