एक्स्प्लोर

Numerology: निडर आणि स्वाभिमानी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; भरपूर कमावतात पैसा

Number 1 Numerology Traits: मूलांक 1 चा स्वामी सूर्य आहे. मूलांक 1 असलेले लोक त्यांच्या दृढनिश्चयी आणि नेतृत्व गुणासाठी ओळखले जातात. त्यांच्या नेमक्या स्वभावाबद्दल जाणून घेऊया.

Numerology Number 1: ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला (Numerology) विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे 0 ते 9 मूलांकावर आधारित असते. प्रत्येक मुलांकाची स्वतःची एक ओळख असते. त्याप्रमाणे, मूलांक 1 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व पूर्णपणे वेगळे असते. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक 1 असतो.

मूलांक 1 चा स्वामी सूर्य आहे, जो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो. मूलांक क्रमांक 1 असलेले लोक त्यांच्या दृढनिश्चयी आणि उत्कृष्ट नेतृत्व शैलीच्या क्षमतेसाठी ओळखले जातात.  1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेचे लोक नेमके कसे असतात? जाणून घेऊया.

मूलांक 1 चे लोक असतात प्रामाणिक

मूलांक 1 असलेले लोक फार प्रामाणिक असतात. काही प्रमाणात हे लोक हट्टी आणि अहंकारी देखील असतात.  1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेचे लोक स्वाभिमानी, अतिशय महत्त्वाकांक्षी असतात. स्वत:ची कामं करण्यात कुशल आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात. या जन्मतारखेचे लोक आकर्षक आणि सुंदर असतात. या लोकांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही.

 1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेचे लोक निडर, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना ते अजिबात घाबरत नाहीत. मात्र, कधी कधी हे लोक स्वार्थीही होतात.

आर्थिक परिस्थिती राहते चांगली

 1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेचे लोक जीवनात भरपूर पैसा कमावतात, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. या जन्मतारखेच्या लोकांना पैशाची कधीच कमतरता भासत नाही. हे लोक आपल्या ऐषोआरामावरही भरपूर पैसा खर्च करतात. या लोकांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते.

मूलांक 1 च्या लोकांचं मूलांक 2, 3, 9 असलेल्या लोकांशी चांगलं जुळतं. त्यांच्यातील प्रेमाचं नातं कायम राहतं.  1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेच्या लोकांना आरोग्याशी संबंधित फारशा समस्या नसतात. मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी रविवार आणि सोमवार हे दिवस शुभ आहेत.

मूलांक कसा काढला जातो?

मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Dev : 2024 मध्ये शनिची स्थिती 3 वेळा बदलणार; मेषसह 'या' राशींच्या लोकांचं उजळणार नशीब

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget