November Grah Gochar 2025 : सूर्य, बुध आणि शुक्र ग्रहांसह मोठ्ठ्या ग्रहांची हालचाल; नोव्हेंबरमध्ये 'या' 4 राशींचं संक्रमण, मिळणार भरघोस फायदा
November Grah Gochar 2025 : नोव्हेंबर महिन्यात तीन मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. यामध्ये सूर्य याच महिन्यात संक्रमण करणार आहे. तर, बुध आणि शुक्र ग्रहदेखील आपल्या चालीत बदल करणार आहेत.

November Grah Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एक ठराविक काळ पूर्ण करण्याआधी राशी परिवर्तन करतात. कारण याचा प्रभाव मानवासह जगभरात पाहायला मिळतो. तसेच, ज्योतिष शास्त्रानुसार, याचा प्रभाव सर्व 12 राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक होतो. त्यामुळे येणारा नोव्हेंबर (November) महिना काही राशींसाठी (Zodiac Signs) फार खास असणार आहे. कारण ग्रहांच्या संक्रमणाचा या राशींवर शुभ परिणाम होणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्यात तीन मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. यामध्ये सूर्य याच महिन्यात संक्रमण करणार आहे. तर, बुध आणि शुक्र ग्रहदेखील आपल्या चालीत बदल करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, सुख-संपत्ती वैभवाचा कारक दाता ग्रह शुक्र 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजून 21 मिनिटांनी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तर, सूर्यदेवता 16 नोव्हेंबरला तूळ राशीत संक्रमण करेल. यामुळे ग्रहांच्या या संक्रमणाने काही राशींना फायदा होणार आहे. तसेच, व्यवसायाचा कारक ग्रह बुध 23 नोव्हेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
नोव्हेंबर महिन्यात तीन ग्रहांच्या संक्रमणाचा प्रभाव मेष राशीच्या लोकांवर होणार आहे. या काळात तुम्हाला एका मागोमाग शुभवार्ता ऐकायला मिळतील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचे जुने मित्र तुम्हाला भेटतील. या काळात तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा महिना आत्मविश्वासाचा असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, तुमच्या जीवनात आनंद टिकून राहील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, बिझनेसमध्ये येणारे अडथळे दूर होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा महिना फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या जीवनात येणारे अडथळे हळुहळू दूर होतील. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता. जे लोक वैवाहित आहेत त्यांच्यासाठी हा काळ आनंददायी असेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा महिना फार लाभदायी असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख-सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पद-प्रतिष्ठेत वाढ झालेली दिसेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान टिकून राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात भाग्यशाली असणार आहे. या काळात मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं असल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. तसेच, जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















