Shani Vakri 2025 : दिवाळीला 'या' 3 राशींना लागली लॉटरी; शनिच्या वक्री चालीने लवकरच सुरु होतील सोन्याचे दिवस, एकामागोमाग टळेल संकट
Shani Vakri 2025 : शनिने मीन राशीत संक्रमण केलं आहे. याचाच अर्थ शनीच्या उलट्या चालीने काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. तर, काही राशींसाठी हा काळ संकटाचा ठरु शकतो.

Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या सगळीकडे दिवाळीचा (Diwali 2025) उत्सव सुरु आहे. दिवाळीच्या याच शुभ मुहूर्तावर कर्मफळदाता शनि वक्री चाल केली आहे. शनिने (Shani Dev) मीन राशीत संक्रमण केलं आहे. याचाच अर्थ शनीच्या उलट्या चालीने काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. तर, काही राशींसाठी हा काळ संकटाचा ठरु शकतो. या ठिकाणी आपण शनिच्या वक्री चालीने कोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ मिळाला आहे ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिची वक्री चाल फार शुभकारक ठरतेय. शनिने वक्री करताच या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून आले. तसेच, या काळात कुटुंबात देखील आनंददादी वातावरण पाहायला मिळतंय. काही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला न्याय मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली पाहायला मिळेल. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. या काळात मित्रांचा सहवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शनिच्या वक्री चालीत झालेल्या बदलाचा सकारात्मक परिणाम कर्क राशीवर देखील दिसून आला आहे. या काळात तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. तुमच्या व्यवसायाला चांगली गती मिळेल. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये नवीन प्रेरणा दिसून येईल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे या काळात तुम्हाला पूर्ण करता येतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ प्रमोशनाचा ठरु शकतो. त्यामुळे शनिच्या वक्री चालीचा सकारात्मक परिणाम कर्क राशीवर पाहायला मिळतोय.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी शनिची वक्री चाल फार लाभदायक ठरतेय. या काळात तुम्हाला जोडीदाराची चांगली साथ मिळेल. तुमच्या प्रत्येक कार्यात जोडीदाराचा देखील तितकाच सहभाग पाहायला मिळेल. आर्थिक स्थितीत भरभराट होईल. तसेच, नवीन प्रोजेक्टची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. जुन्या आर्थिक समस्यांपासून तुमची सुटका होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















