Shani Asta 2024: नवीन वर्ष 2024 ची सुरुवात 'या' राशींच्या लोकांसाठी ठरणार घातक; शनि अस्तामुळे उद्भवणार आर्थिक समस्या
Shani Asta 2024: नवीन वर्षाच्या सुरुवातीला शनि अस्तामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे या राशींना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे.
Shani Asta 2024: ज्योतिषशास्त्रात शनिदेव (Shani Margi 2023) हा कर्म आणि न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. शनि सर्वात संथ गतीने आपली रास बदलतो. ज्योतिष शास्त्रानुसार सध्या शनि कुंभ राशीत स्थित आहे. 2024 मध्ये सुद्धा तो त्याच राशीत राहील. पण या काळात मधेमधे शनि मावळेल, उगवेल आणि मागे देखील जाईल. शनि हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. त्यामुळे शनीच्या स्थितीतील थोडासा बदल देखील 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर निश्चितपणे विविध प्रभाव टाकतो.
नवीन वर्ष 2024 मध्ये 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 2024 या कालावधीत शनि मावळणार आहे, म्हणजेच शनिचा या काळात अस्त असणार आहे. शनिच्या अस्तामुळे काही राशींच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आता नेमक्या या राशी कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या अकराव्या घरात शनि असणार आहे. शनिच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या इच्छा पूर्ण करत असताना काही अडचणी येऊ शकतात. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर या काळात थोडं थांबा, अन्यथा आर्थिक स्थितीवर काही विपरीत परिणाम होऊ शकतो. पण घाबरून जाण्याची गरज नाही, कारण 18 मार्चला शनिचा पुन्हा उदय होणार आहे. शनिच्या अस्तामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात काही कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. यासोबतच या काळात आरोग्याची थोडी काळजी घेणं आवश्यक आहे.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शनि आहे. शनिचा कुंभ राशीत प्रवेश झाला असून तो वृषभ राशीच्या दहाव्या घरात स्थित असणार आहे. त्यामुळे 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यात शनिचा अस्त होणार आहे, हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी अडचणी वाढवणारा ठरणार आहे. खूप प्रयत्न करूनही तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळणार नाही. या काळात काही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायातही थोडं सावध राहावं लागेल, अन्यथा नुकसानीची शक्यता आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी समस्या सहन करावी लागणार आहे. या लोकांना आरोग्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे.
कन्या रास (Virgo Zodiac)
कन्या राशीमध्ये, शनि सहाव्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे आणि सहाव्या भावात स्थित असेल. शनिच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. शनि अस्तामुळे कन्या राशीच्या लोकांना कठोर परिश्रम करूनही यश मिळवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर असू शकते. या काळात तुम्हाला आरोग्याबाबत थोडं सावध राहण्याची गरज आहे, कारण काही जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Budh Gochar 2023: आज बुध करणार वृश्चिक राशीत गोचर; 'या' राशींना मिळणार विशेष लाभ