Navratri 2024 : 'ही' आहेत भारतातील प्रसिद्ध देवीची मंदिर; नवरात्रीला आवर्जून भेट द्या
Navratri 2024 : देवी दुर्गेला चामुंडा, अंबाबाई, कामाख्या अशा अनेक नावांवरून ओळखले जाते. आपल्या भारतात देवीचे असे अनेक मंदिर आहेत यामध्ये देवीच्या मंदिरांना शक्तिपीठं म्हणून स्थापना करण्यात आली आहे.
Navratri 2024 : नवरात्रौत्सवाला (Navratri 2024) अवघे काही दिवस राहीले आहेत. या दरम्यान देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. आपल्या सर्वांना माहीत आहे की, देवी दुर्गेला चामुंडा, अंबाबाई, कामाख्या अशा अनेक नावांवरून ओळखले जाते. आपल्या भारतात देवीचे असे अनेक मंदिर आहेत यामध्ये अनेक देवीच्या मंदिरांना शक्तिपीठं म्हणून स्थापना करण्यात आली आहे. यापैकी अनेक मंदिरात वर्षभर भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण देवीच्या अशाच काही प्रसिद्ध मंदिरांविषयी जाणून घेणार आहोत.
1. वैष्णो देवी मंदिर, जम्मू आणि काश्मीर
वैष्णौदेवी मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर माता वैष्णो देवीला समर्पित आहे. जम्मू-काशीमरमध्ये असलेल्या या मंदिरात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी वर्षभर भक्तांची गर्दी पाहायला मिळते. विशेषत: नवरात्रीच्या दिवसांत या ठिकाणी जास्त गर्दी असते.
मंदिराला भेट देण्यासाठीची योग्य वेळ - मार्च ते ऑक्टोबर
कसे पोहोचाल? या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला कटरा हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन लागेल.
2. बनशंकरी मंदिर, कर्नाटक
हे कर्नाटकातील दुर्गा देवीचं सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. जंगलाच्या मध्यभागी असल्या कारणाने या मंदिराला वनशंकरी नाव देण्यात आलं आहे. या मंदिरात देवीच्या काळ्या रंगात मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. या मंदिराची निर्मिती 17 व्या शतकात करण्यात आली होती.
कसे पोहोचाल?
तुम्हाला या मंदिराला पोहोचण्यासाठी बदामी हे रेल्वे स्टेशन सर्वात जवळचं आहे.
मंदिराला भेट देण्यासाठीची योग्य वेळ - जानेवारी, फेब्रुवारी
3. दुर्गा मंदिर, वाराणसी
हे फक्त वाराणसीच नाही तर भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या ठिकाणी संपूर्ण वर्षभर भक्तांची गर्दी पाहायला मिळते. हे मंदिर वाराणसी शहरात असल्या कारणाने या ठिकाणी अगदी सहज पोहोचता येते.
मंदिराला भेट देण्यासाठीची योग्य वेळ - नोव्हेंबर ते फेब्रुवारी
कसे पोहोचाल ?
हे मंदिर वाराणसी स्टेशनहून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: