एक्स्प्लोर
Guru Asta 2025 : आज गुरु बृहस्पतीचा होतोय अस्त; 9 जुलैपर्यंत 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर, संकटं पाठ सोडणार नाही
Guru Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच 12 जून 2025 रोजी गुरु ग्रह बृहस्पती पश्चिम दिशेला अस्त होणार आहे.
Guru Asta 2025
1/7

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच 12 जून 2025 रोजी गुरु ग्रह बृहस्पती पश्चिम दिशेला अस्त होणार आहे. गुरुच्या अस्त होण्याने काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
2/7

मेष रास - मेष राशीच्या तिसऱ्या चरणात गुरु ग्रहाचा अस्त होणार आहे. हे शुभ मानलं जात नाही. या परिस्थितीत कोणाशीही घेवाण-देवाणीचा व्यवहार करु नका. कुटुंबात देखील अनेक समस्या उद्भवतील.
3/7

मिथुन रास - मिथुन राशीच्या पहिल्या चरणात गुरुचा अस्त होतोय. या राशींना आज आळसपणा जाणवेल. तसेच, विवाहासाठी येणारे प्रस्ताव टळू शकतात. तुमच्या बिझनेसमध्ये देखील तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील.
4/7

वृश्चिक रास - वृश्चिक राशीच्या आठव्या चरणात गुरुचा अस्त होतोय. या रासींच्या आरोग्यात अनेक अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात फार मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक अडचण येऊ शकते.
5/7

सिंह रास - सिंह राशीच्या लोकांना देखील गुरुच्या अस्ताचा सामना करावा लागणार आहे. या काळात कोणतंच काम तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान लाभणार नाही. मन उदास राहील.
6/7

कन्या रास - कन्या राशीच्या दहाव्या चरणात गुरु ग्रहाचा अस्त होणार आहे. या राशींच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं. त्यामुळे कोणतंच आव्हान स्वीकारु नका. आपल्या कामाशी प्रामाणिक राहा.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 12 Jun 2025 09:13 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















