एक्स्प्लोर

Monthly Horoscope September 2023 : सप्टेंबर महिना 'या' राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक! 5 महत्त्वाच्या ग्रहांचे परिवर्तन, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Monthly Horoscope September 2023 : सप्टेंबर महिना अनेकांना यशाकडे घेऊन जाणारा ठरेल. तर, दुसरीकडे काही राशींसाठी आव्हानात्मक असेल.

Monthly Horoscope September 2023 : उद्यापासून सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. नवीन महिना अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे. हा महिना अनेकांना यशाकडे घेऊन जाणारा ठरेल. तर, दुसरीकडे सप्टेंबर महिना काही राशींसाठी शुभ असणार नाही. सप्टेंबरमध्ये मेष राशीत राहू आणि गुरुच्या संयोगामुळे गुरु चांडाळ योग तयार होत आहे. काही राशीच्या लोकांच्या जीवनावर याचा खूप नकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात सप्टेंबर महिन्याचं राशीभविष्य. 

मेष

मेष राशीत गुरु चांडाळचा अशुभ योग तयार होत आहे, त्यामुळे सप्टेंबरमध्ये या राशींच्या अडचणी वाढणार आहेत. या योगामुळे तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागणार आहे. तुमची निर्णय क्षमता आणि तर्कशुद्धता या महिन्यात प्रभावित होऊ शकते. तुमची आर्थिक स्थितीही या महिन्यात फारशी चांगली नसणार. या महिन्यात मेष राशीच्या लोकांना कोणताही निर्णय सावधपणे घ्यावा लागेल, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. जीवनातील कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी तुम्ही घरातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला घेऊ शकता. सप्टेंबरमध्ये तुमची तब्येतही बिघडू शकते. म्हणूनच आपल्या आहार आणि दिनचर्याकडे लक्ष द्या.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2023 महिना चांगला जाणार आहे. कोणतीही नवीन व्यवसाय कल्पना तुमच्यासाठी चांगली ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवू शकाल. छोट्या कौटुंबिक सहलीला जाण्याचा देखील योग आहे. या महिन्यात तुम्हाला आरोग्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागेल. हलगर्जीपणा केल्यास महागात पडू शकतं. विदयार्थ्यांना शिक्षणा संबंधित काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरदार वर्गाला नोकरीत चांगली संधी मिळू शकते. तुमची पगारवाढ आणि बदलीही होऊ शकते. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2023 मध्ये तुम्हाला पैशाच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सप्टेंबरमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थी मोठ्या प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. या महिन्यात तुम्ही एखाद्या चांगल्या मालमत्तेत देखील गुंतवणूक करू शकता. तसेच, भागीदारीत व्यवसाय करणे देखील तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. या महिन्यात तुम्हाला धनलाभ देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. इतरांच्या खाजगी आयुष्यात लुडबूड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

कर्क 

सप्टेंबर 2023 महिना कर्क राशीच्या लोकांसाठी ठीक राहील. या महिन्यात तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर कोणाच्याही सल्ल्याशिवाय पैसे गुंतवू नका. तुमच्या वैवाहिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. या महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. अनावश्यक प्रवास टाळा. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि ध्यान करणं फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाणार आहे. आवडत्या विषयावर अभ्यास करण्याची संधी मिळेल तसेच नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील. 

सिंह

सप्टेंबरमध्ये सिंह राशीच्या लोकांनाही खूप काळजी घ्यावी लागेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या रागावर आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमची लोकांशी भांडणे वाढतील आणि यामुळे तुमची बरीच कामे रखडतील. या महिन्यात रागाच्या भरात कोणतेही काम करू नका. सप्टेंबरमध्ये सिंह राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. जोडीदाराबरोबर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होईल. याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होईल. या महिन्यात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होईल.

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2023 हा महिना मार्केटिंग, मीडिया, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी भाग्याचा ठरू शकतो. तुमच्या घरी नवीन पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. वैवाहिक जीवनात आनंद असेल. फक्त कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या मध्ये येण्याने नात्यात दुरावा निर्माण करू नका. या महिन्यात अपघात टाळण्यासाठी तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू शकता. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल आहे. परदेशात जाण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

तूळ 

सप्टेंबर 2023 हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी काही खास असणार नाही. बेरोजगार लोक नोकरीच्या शोधात असतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचा तुमचा प्रयत्न असेल. नोकरी व्यतिरिक्त इतरही व्यवसायाचे मार्ग तुम्ही शोधाल. जेणेकरून पैसा हातात राहील. या महिन्यात तुमच्या जोडीदाराची तुम्हाला नव्याने ओळख होईल. तुमच्या त्यांच्यावरचा विश्वास आणि प्रेम आणखी वाढेल. कुटुंबात देखील वातावरण प्रसन्न असणार आहे. या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखादा दिर्घकालीन आजार असेल तर त्याकडे हलगर्जीपणा करू नका. 

वृश्चिक

सप्टेंबरमध्ये वृश्चिक राशीच्या लोकांनाही खूप काळजी घ्यावी लागेल. या महिन्यात कोर्टाच्या कचेरीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुमच्या कामात अडचण येऊ शकते. तुमच्या वैवाहिक जीवनासाठीही हा महिना अनुकूल नाही. तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो. वृश्चिक राशीचे लोक वाईट प्रेम संबंधांमुळे तणावात राहू शकतात. या महिन्यात असे कोणतेही काम करणे टाळा ज्यामुळे नात्यावर परिणाम होईल. या महिन्यात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो.  

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2023 महिना चांगला जाणार आहे. तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे व्यवसायात तुमची प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामाचा अधिक ताण येऊ शकतो. मात्र, कामाच्या ठिकाणी असलेला तुमचा सकारातमक दृष्टिकोन तुम्हाला फार पुढे घेऊन जाईल. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल आहे. सप्टेंबरमध्ये फुफ्फुसाचे किंवा श्वसनाचे आजार होऊ शकतात, काळजी घ्या.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2023 महिना संमिश्र फलदायी असणार आहे. सप्टेंबर महिन्यात तुमच्या नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात पारदर्शकता ठेवा, यामुळे तुमच्या घरात सुख-शांती राहील. या महिन्यात तुमच्या व्यवसायात देखील प्रगती होऊ शकते. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक जीवन चांगले आणि अनुकूल राहील. स्पर्धेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी चांगला आणि पुढे जाणारा असेल. तुमची आरोग्यविषयक जागरुकता तुमचा मानसिक ताण दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

कुंभ

सप्टेंबर महिन्यात कुंभ राशीच्या लोकांच्या प्रगतीत खूप अडथळे येणार आहेत. तुमची अनेक पूर्ण झालेली कामेही खराब होऊ शकतात. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल ज्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन देखील या महिन्यात खराब होऊ शकते. तुमच्यात भांडणे वाढू शकतात. सप्टेंबर महिन्यात कुंभ राशीच्या लोकांना खर्चाची चिंता लागू शकते. या महिन्यात तुम्हाला कर्ज घेण्याचीही संधी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता.

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2023 महिना चांगला राहील. सप्टेंबरमध्ये, तुमच्या कोणत्याही लहानशा निष्काळजीपणाचा तुमच्या प्रगतीवर परिणाम होईल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.  या महिन्यात होणारे खर्च तुमच्या चिंतेचं कारण ठरू शकतात. या महिन्यात कौटुंबिक शांतीसाठई तुम्हाला मौल्यवान क्षण काढावे लागतील. वैवाहिक जीवनात संतुलन राहील. फक्त अहंकार बाजूला ठेवा. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकते, तुम्ही जागरूक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 31 August 2023 : कर्क, कन्या, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक भरभराटीचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Hindu Religion: देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
Horoscope Today 11 August 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Gajkesari Rajyog: 4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....
4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget