Mercury Transit : ग्रहांचा राजकुमार बुध करणार कुंभ राशीत प्रवेश; 20 फेब्रुवारीपासून उजळणार 'या' 3 राशींचं नशीब
Mercury Transit In Kumbha : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या संक्रमणामुळे काही राशींचं नशीब पालटणार आहे, नोकरी-व्यवसायात त्यांना कमालीचं यश मिळणार आहे.
Budh Gochar In Kumbha 2024 : प्रत्येक ग्रहाच्या चालीतील बदल हा कोणत्या ना कोणत्या राशीच्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम करत असतो. यातच वैदिक पंचांगानुसार, आता बुध ग्रह 20 फेब्रुवारीला आपली रास बदलेल. बुधाच्या (Mercury) राशी परिवर्तनामुळे काही राशींचं नशीब पालटणार आहे. यासोबतच नोकरी-व्यवसायातही या लोकांना अफाट यश मिळेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
बुधाचा राशी बदल तुमच्यासाठी चांगला सिद्ध होऊ शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या 11व्या घरात जाणार आहे, त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी, तुम्ही गुंतवणुकीद्वारे नफा देखील मिळवू शकता. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल आणि तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच या काळात तुम्ही शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये पैसे कमवू शकता.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा राशी बदल अनुकूल ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून नवव्या भावात प्रवेश करणार आहे, त्यामुळे यावेळी नशीब तुमच्या बाजूने असू शकतं. त्याच बरोबर, तुमच्या नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात. यावेळी तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. तसेच, नोकरी बदलण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत पदोन्नती अडकली असेल तर तुमच्यासाठी प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. या काळात तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता, हा प्रवास तुमच्यासाठी शुभ राहील.
मकर रास (Capricorn)
बुध राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो . कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून धन आणि वाणीच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. तसेच तुमचे संवाद कौशल्य मजबूत होईल. तुम्ही नवीन लोकांशी संबंध विकसित करू शकता. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील आणि करिअर आणि कमाईच्या बाबतीत तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकाल. यासोबत, यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. दुसरीकडे, जर तुमचं काम किंवा व्यवसाय मार्केटिंग, कम्युनिकेशन, मीडिया आणि भाषण क्षेत्राशी संबंधित असेल तर या काळात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Bhishmashtami 2024 : भीष्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि पौराणिक कथा