May Month Calendar 2024 : अक्षय्य तृतीयेपासून ते दुर्गा अष्टमीपर्यंत...मे महिन्यातील प्रमुख उपवास आणि सणांची संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर...
May Month Calendar 2024 : मे महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ असणार आहे. खरंतर, या महिन्यात अनेक मोठे सण साजरे केले जातील.
![May Month Calendar 2024 : अक्षय्य तृतीयेपासून ते दुर्गा अष्टमीपर्यंत...मे महिन्यातील प्रमुख उपवास आणि सणांची संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर... May Month Calendar 2024 akshaya tritiya to durga ashtami here is full list of may month festivals marathi news May Month Calendar 2024 : अक्षय्य तृतीयेपासून ते दुर्गा अष्टमीपर्यंत...मे महिन्यातील प्रमुख उपवास आणि सणांची संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/5608373354d0004601153dca4cf97e3b1714193379784358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
May Month Calendar 2024 : हिंदू धर्मग्रंथात पूजा, तिथी आणि सणांना (Festivals) विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. वर्षाच्या 12 महिन्यांतील प्रत्येक महिन्यात काही उपवास, तिथी आणि सण साजरे केले जातात. हे सण-समारंभ वेगवेगळ्या देवी-देवतांना समर्पित आहे. एप्रिल (April) महिना संपून देखील मे महिना अवघ्या काही दिवसांनी सुरु होणार आहे. एप्रिल महिन्यात नवरात्री (Chaitra Navratri) आणि रामनवमीपासून (Ram Navami) हनुमान जन्मोत्सवापर्यंत (Hanuman Jayanti) अनेक मोठे सण साजरे केले जात असताना मे महिन्यातही अनेक मोठे सण साजरे होणार आहेत. तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे सांगणार आहोत की, मे महिन्यात कोणते प्रमुख सण साजरे केले जातात.
खरंतर, मे महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ असणार आहे. खरंतर, या महिन्यात अनेक मोठे सण साजरे केले जातील. ज्यामध्ये परशुराम जयंती, गंगा सप्तमी, वृषभ संक्रांती, बुद्ध पौर्णिमा, अक्षय्य तृतीया यासह अनेक मोठे सण साजरे केले जातील.
उपवास आणि सणांची संपूर्ण यादी येथे पाहा
दिनांक | सण |
1 मे, बुधवार | मासिक कालाष्टमी व्रत, मासिक कृष्ण जन्माष्टमी |
4 मे, शनिवार | वरुथिनी एकादशी व्रत, वल्लभाचार्य जयंती |
6 मे, सोमवार | मासिक शिवरात्री |
8 मे, बुधवार | वैशाख अमावस्या |
10 मे, शुक्रवार | परशुराम जयंती, अक्षय्य तृतीया, रोहिणी व्रत. |
11 मे, शनिवार | विनायक चतुर्थी |
12 मे, रविवार | शंकराचार्य जयंती, सूरदास जयंती, रामानुज जयंती, मातृदिन |
13 मे, सोमवार | षष्ठी व्रत |
14 मे, मंगळवार | गंगा सप्तमी व्रत, वृषभ संक्रांती. |
15 मे, बुधवार | मासिक दुर्गाष्टमी |
16 मे, गुरुवार | सीता नवमी |
19 मे, रविवार | मोहिनी एकादशी व्रत, परशुराम द्वादशी. |
20 मे, सोमवार | मासिक प्रदोष व्रत |
21 मे, मंगळवार | नरसिंह जयंती |
23 मे, गुरुवार | बुद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा व्रत |
24 मे शुक्रवार | नारद जयंती, ज्येष्ठ महिना सुरू |
26 मे, रविवार | एकदंत संकष्टी चतुर्थी |
30 मे, गुरुवार | मासिक कालाष्टमी व्रत, मासिक कृष्ण जन्माष्टमी |
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : 12 मे पासून बदलणार शनीची चाल; 'या' राशींचा शुभ काळ होणार सुरू, नोकरी-व्यवसायात प्रगतीसह उत्पन्न वाढणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)