Malavya Rajyog : आज घडतोय मालव्य राजयोग; 'या' 5 राशींना येणार चांगले दिवस, मिळणार अपेक्षित यश
Malavya Rajyog : शुक्र ग्रह तूळ राशीत गेल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे, हा योग अनेक राशींसाठी फलदायी ठरणार आहे.
![Malavya Rajyog : आज घडतोय मालव्य राजयोग; 'या' 5 राशींना येणार चांगले दिवस, मिळणार अपेक्षित यश Malavya Rajyog today 5 zodiac signs will get expected success due to shukra gochar Malavya Rajyog : आज घडतोय मालव्य राजयोग; 'या' 5 राशींना येणार चांगले दिवस, मिळणार अपेक्षित यश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/ea1b95384fa8cf183340f9b3b0e3468a1696341956127466_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shukra Gochar : नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ग्रहांच्या स्थितीनुसार खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यात आज (29 नोव्हेंबर) शुक्र ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह तूळ राशीत गेल्याने ‘मालव्य राजयोग’ तयार होईल. ज्योतिषशास्त्रात या योगांना विशेष महत्त्व असतं. या शुभ-अशुभ योगांचे राशींवर (Zodiac Signs) चांगले-वाईट परिणाम होत असतात. आज बनत असलेला मालव्य राजयोग मेष आणि मिथुनसह 5 राशींसाठी सर्वोत्तम असणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल, तसेच गुंतवणुकीत फायदा होईल.
आज (29 नोव्हेंबर 2023) रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या कन्या राशीतून शुक्र स्वराशीत येत आहे. कन्या राशीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकल्यानंतर आता शुक्र तूळ राशीत पोहोचत आहे. 24 डिसेंबर 2023 पर्यंत शुक्र स्वराशीत, म्हणजेच तूळ राशीत असणार आहे. या योगाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे.
मेष रास (Aries)
शुक्र ग्रह 24 डिसेंबरपर्यंत स्वराशीत असल्याचा फायदा मेष राशीच्या लोकांना होणार आहे. तयार होत असलेल्या मालव्य राजयोगामुळे या काळात तुमचं कुटुंबात मन मरेल. कामात उत्साह वाढेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर प्रगतीचा योग आहे. वाणीशी संबंधित व्यवसाय जसं की, सेल्स मार्केटिंग किंवा शिक्षकांना खास लाभ होईल. कौटुंबिक कामात प्रगती होईल. आनंद मिळेल. वैवाहिक जीवन सुखाचं होईल. प्रेम संबंधात सुधारणा होईल. नोकरीतील तणाव संपेल.
वृषभ रास (Taurus)
शुक्राच्या मार्गक्रमणामुळे वृषभ राशीचं उत्पन्न वाढेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. मनोधैर्य उंचावलेलं असेल. नातेवाईकांमुळे मन दु:खी राहील. सर्व पूर्ण क्षमतेनं निर्णय घ्याल. प्रेमप्रकरणासाठी अनुकूल काळ असेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील, आनंद राहील. जमीन-जुमला आणि कायदेशीर प्रकरणांमुळे ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini)
शुक्राचं मार्गक्रमण मिथुन राशीसाठी फलदायी ठरणार आहे. तुम्ही बुद्धीकौशल्याचा वापर करून नव्या कामाला सुरुवात कराल. विद्यार्थी आणि शिक्षक वर्गासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. चैनीच्या खर्चात वाढ होईल. मुलांच्या भवितव्याची चिंता कमी होईल. उत्तम प्रगती होईल. कलेच्या क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील.
कर्क (Cancer)
मालव्य राजयोगामुळे कर्क राशीला चांगले दिवस येतील. या काळात तुम्ही आनंदी राहाल. सुखात वाढ होईल. आईची तब्येत ठणठणीत राहील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. मालमत्तेशी संबंधित काही व्यवहार केल्यास लाभ होईल. व्यवसायात वृद्धीचा योग आहे. जमिनीशी संबंधित व्यवसायात यश मिळेल.
सिंह (Leo)
शुक्राचं स्वराशीत असणं सिंह राशीसाठी फलदायी ठरेल. या काळात तुमचं धाडस वाढेल. नोकरी करत असाल तर प्रमोशन आणि बदलीची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी अनुकूल दिवस आहे. सामाजिक पाठिंबा वाढण्याची शक्यता आहे. कष्टाचं योग्य ते फळ मिळेल. कुटुंबीय आणि मित्रमंडळींची साथ आणि प्रेम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. कलेच्या क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)