एक्स्प्लोर

Magh Gupt Navratri 2024 : गुप्त नवरात्रीदरम्यान करा 'ही' कामं; सर्व मनोकामना होतील पूर्ण, प्रगतीची दारं होतील खुली

Magh Gupt Navratri 2024 : माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र म्हणतात. या नवरात्रीत काही कामं केल्याने व्यक्तीला विशेष फळ प्राप्त होते. मात्र, या नवरात्रीदरम्यान काही चुका टाळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

Magh Gupt Navratri 2024 : माघ (Magh) महिन्याची गुप्त नवरात्री यंदा 10 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी या नवरात्रीमध्ये गुप्त रुपाने पूजा पाठ केला जातो. या कालावधीत संपूर्ण 9 दिवस भक्त दुर्गेच्या 9 रूपांची भक्तिभावाने पूजा करतात. या कालावधीत ‘गुप्त’ रूपाने पूजापाठ केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. 18 फेब्रुवारीला गुप्त नवरात्री समाप्त होईल. या दरम्यान काही कामं केल्याने देवीची विशेष कृपा प्राप्त होते, मात्र यादरम्यान काही चुका देखील टाळल्या पाहिजे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

गुप्त नवरात्रीदरम्यान करा ‘ही’ कामं

  • गुप्त नवरात्रीच्या काळात कर्जातून मुक्त होण्यासाठी देवी दुर्गेसमोर धूप प्रज्वलित करावा, यामुळे कर्जातून मुक्ती मिळते.
  • गुप्त नवरात्रीत देवी लक्ष्मीची पूजा करताना तिला कमळाचं फूल अर्पण करावं. तुमच्याकडे कमळाचं फूल नसल्यास तुम्ही कमळाच्या फुलाचा फोटो देखील ठेवू शकता, असं केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.
  • जर तुम्ही गुप्त नवरात्रीत सोन्याचे किंवा चांदीचे नाणे घरी आणले, तर देवी लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. हे नाणे आपल्या घरात संपत्ती, आनंद आणि समृद्धी आणते.
  • माघी नवरात्रीदरम्यान, दुर्गा देवीला लाल फुलं अर्पण करावीत. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल, तर ते बरे होतील. त्याचबरोबर ‘ऊं क्रीं कालिकायै नम:’ या मंत्राचा जप देखील करावा, यामुळे घरातील व्यक्तीला देवीचा आशीर्वाद मिळतो.
  • या नवरात्रीच्या काळात घरात मोराचं पीस आणणं अतिशय शुभ मानलं जातं. मोर हे लक्ष्मी देवीचं वाहन आहे. घरी मोराचं पीस आणल्याने तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते.

चुकूनही करू नका ‘ही’ कामं

  • नवरात्रीच्या काळात सर्वांशी चांगलं वागा. कोणालाही तुच्छ लेखू नका, वाईट बोलू नका.
  • या काळात केस कापू नका, दाढी करू नका किंवा आपली नखं देखील कापू नका.
  • देवीच्या पूजेच्या वेळी लाल, पिवळे, शुभ्र कपडे घाला, काळे कपडे घालू नका.
  • नवरात्रीच्या काळात मांस, दारू आणि धुम्रपान टाळा.
  • या दिवसांत कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करु नका.
  • नवरात्रीच्या काळात कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. हिंदू धर्मात कन्येला देवीप्रमाणे मानलं जातं.
  • तुमची उपासना पूर्णपणे गुप्त ठेवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Magh Maas 2024 : शनिवारपासून माघ मासारंभ; या महिन्यात असणार 'हे' महत्त्वाचे सण, फलप्राप्तीसाठी करा खास उपाय

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget