एक्स्प्लोर

Lord Shiv: शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..

Lord Shiv: भगवान शिवाची पूजा करताना अनेक भक्तांच्या मनात प्रश्न येतो की, शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धी (अपूर्ण) प्रदक्षिणा का घातली जाते? यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

Lord Shiv: हिंदू धर्मानुसार अनेक देवी-देवता आणि त्यांची मंदिरे आहेत, ज्याचे वेगवेगळी पूजा पद्धत आणि नियम सांगितले जातात. जेव्हा आपण मंदिरात जातो. तेव्हा अनेकदा पाहतो, की इतर देवी-देवतांना पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते, परंतु शिवलिंगाच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही, ज्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, भगवान शिवाच्या पूजेत शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याची परंपरा अनेक शिवमंदिरांमध्ये का पाळली जाते. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय दोन्ही कारणे सांगितली जातात.

शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणाच का घातली जाते? (Lord Shiv)

शिवभक्त ज्या महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो महिना म्हणजे श्रावण महिना यंदा 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होतोय. हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवाचा सर्वात प्रिय महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवभक्त उपवास, रुद्राभिषेक, जप, ध्यान आणि शिवपूजा करून भोलेनाथांची आराधना करतात. धार्मिक मान्यतेनुसार, श्रावणात भक्तिभावाने केलेली शिवपूजा अनेकपटींनी पुण्यदायी ठरते आणि मनोकामना पूर्ण होतात. मात्र भगवान शिवाची पूजा करताना अनेक भक्तांच्या मनात प्रश्न पडतो की, शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धी (अपूर्ण) प्रदक्षिणा का घातली जाते? यामागे धार्मिक आणि शास्त्रातील महत्त्वाचे कारण सांगितले जाते.

सोमसूत्राला ओलांडू नये..

धार्मिक मान्यतेनुसार, शिवलिंगावर अर्पण केलेले जल, दूध, पंचामृत आणि इतर पूजेचे पदार्थ ज्या मार्गाने बाहेर पडतात, त्या भागाला जलहरी किंवा सोमसूत्र म्हणतात. हा भाग अत्यंत पवित्र मानला जात असल्याने तो ओलांडू नये, अशी शैव परंपरा आहे.

शिवतत्त्वाचा सन्मान

धार्मिक श्रद्धेनुसार, जलहरीतून शिवतत्त्वाचा सूक्ष्म ऊर्जा प्रवाह होत असतो. त्यामुळे त्या भागावरून पाय ठेवणे किंवा तो ओलांडणे योग्य मानले जात नाही. म्हणून भक्त त्या ठिकाणी नमस्कार करून परत फिरतात.

नम्रता आणि भक्तीचे प्रतीक

धार्मिक मान्यतेनुसार, अर्धी प्रदक्षिणा म्हणजे भगवान शिवांप्रती आदर, विनय आणि शरणागती व्यक्त करण्याचा एक मार्ग मानला जातो. ही कृती अहंकाराचा त्याग करून भक्तिभावाने पूजा करण्याचा संदेश देते.

शैव परंपरेचे पालन

शिवपुराण आणि शैव परंपरेत शिवपूजेचे अनेक नियम सांगितले आहेत. त्यानुसार, अनेक मंदिरांमध्ये जलहरी ओलांडू नये, अशी प्रथा आजही पाळली जाते. त्यामुळे अर्धी प्रदक्षिणा ही शास्त्रपरंपरेचा भाग मानली जाते.

आध्यात्मिक लाभ

धार्मिक श्रद्धेनुसार, नियमपूर्वक अर्धी प्रदक्षिणा घातल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. भक्ताच्या जीवनातील विघ्ने दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी मान्यता आहे.

अर्धी प्रदक्षिणा कशी घालावी?

  • प्रथम भगवान शिवाचे दर्शन घेऊन नमस्कार करावा.
  • शिवलिंगाची प्रदक्षिणा डाव्या बाजूने सुरू करावी
  • जलहरी (सोमसूत्र) येताच थांबावे आणि ती ओलांडू नये.
  • तेथून परत फिरून दुसऱ्या बाजूने मूळ ठिकाणी यावे. 
  • यालाच अर्धी किंवा अर्धचंद्राकार प्रदक्षिणा म्हणतात.
  • परत येण्याच्या या पद्धतीकडे विशेष लक्ष द्यावे. 

यंदा किती श्रावणी सोमवार आहेत? (Shravan Somvar 2026)

धार्मिक मान्यतेनुसार, हिंदू धर्मानुसार, श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो, परंतु या महिन्यातील सोमवार विशेषतः भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपवासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भाविकांची अशी धारणा आहे की, या दिवशी उपवास केल्याने आणि शिवलिंगाला जल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. 

पहिला सोमवार: 17 ऑगस्ट
दुसरा सोमवार: 24 ऑगस्ट
तिसरा सोमवार: 31 ऑगस्ट
चौथा सोमवार: 7 सप्टेंबर

शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा?

धार्मिक मान्यतेनुसार, शिवलिंगाचा अभिषेक नेहमी गंगाजल किंवा शुद्ध पाण्यानेच करावा. जर तुमचे मन शांत नसेल, तर शिवलिंगाचा अभिषेक गाईच्या दुधाने करावा. पाण्याची धार शिवलिंगावर बारीक आणि हळू पडेल याची खात्री करा. अभिषेक करताना नेहमी पूर्वेकडे तोंड करा. या दिशेला बसून किंवा गुडघे टेकून अभिषेक करावा. उभे राहून अभिषेक करण्यास मनाई आहे. या गोष्टी लक्षात न घेतल्यास, अभिषेकाचे पुण्यकर्म प्राप्त होणार नाही.

हेही वाचा :

Sankashti Chaturthi 2026: आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 22 August 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget