Geeta Dnyan : 'या' लोकांना वृद्धापकाळात भोगावी लागतात पापं, जाणून घ्या गीतेची अमूल्य शिकवण
Shree Krishna Motivational Quotes : हिंदू धर्मात भगवत गीता हा पवित्र ग्रंथ मानला जातो. भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. शिवाय जीवनाचं सार सांगितलं आहे.
Shree Krishna Geeta Dnyan : असे मानले जाते की, श्रीमद्भागवतगीता (Bhagvad geeta) हा एकमेव धर्मग्रंथ आहे, जो मानसाला खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतो. गीतेमधून मानवाला जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देण्यात आले आहेत. गीतेतील ही शिकवण श्रीकृष्णाने (Lord Shri Krishna) अर्जुनाला महाभारत युद्धात दिली होती. ही शिकवण माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. श्रीमद्भागवत गीतेचे वचन अंगीकारल्याने जीवन सुधारते. या गोष्टींचे पालन केल्याने व्यक्तीचा राग आणि मत्सराची भावना संपते. जाणून घ्या श्रीकृष्णाने कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत.
...तर वृद्धापकाळात दुःख भोगावे लागते
हिंदू धर्मात भगवत गीता हा पवित्र ग्रंथ मानला जातो. भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. शिवाय जीवनाचं सार सांगितलं आहे. श्रीकृष्ण म्हणतात की, वस्त्र बदलण्याऐवजी माणसाने हृदय बदलण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गीतेनुसार ज्याने तारुण्यात जास्त पाप केले असेल त्याला वृद्धापकाळात दुःख भोगावे लागते. श्रीमद्भागवत गीतेनुसार आनंद हा नेहमी माणसाच्या आत असतो, पण मनुष्याला तो बाह्य सुखांमध्ये सापडतो. देवाची आराधना केवळ शरीराने न करता संपूर्ण मनाने केली पाहिजे. देवाची उपासना त्यांना प्रेमाच्या बंधनात बांधते. मनुष्य पुनर्जन्म घेतो केवळ त्याच्या वासनेमुळे. माणसाने आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवला तर त्याच्या आयुष्यात कधीही विकार आणि संकटे येत नाहीत. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा हे गुण सत्संगाशिवाय माणसात कधीच येत नाहीत.
माणसाला देवाशिवाय कोणी नाही
श्रीकृष्ण म्हणतात की, मनुष्याने भगवंतात विलीन व्हावे. माणसाला देवाशिवाय कोणी नाही. यासोबतच ते कोणाचेही नाही, हे लक्षात घेऊन काम केले पाहिजे. उपभोगातून मिळणारा आनंद हा तात्पुरता असतो तर त्यागातून मिळणारा आनंद हा शाश्वत असतो. श्रीकृष्ण म्हणतात की, भगवंताच्या कृपेने सत्संग तर मिळतोच पण मनुष्याला त्याच्या कर्मांमुळे वाईट संगतही लाभते.
गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन समृद्ध होते
भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हीसाठी खूप उपयुक्त मानले गेले आहे. असे म्हटले जाते की, गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे. गीतेतील तत्वज्ञाने पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. गीतेत श्रीकृष्णाने दु:खाला सर्वात चांगला मित्र म्हटले आहे. त्याचे कारण देखील गीतेत देण्यात आले आहे. आज देखील अनेक लोक गीतेतील शिकवण अंगीकारून जीवन जगत आहेत. गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन समृद्ध होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)