Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांचं भाकित, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार?
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा अंदाज वर्तवला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे असं ते म्हणाले.
Lok Sabha Election 2024 : देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल येत्या 4 जून रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत अनेक मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. त्यामुळे नेमकं कोणतं सरकार निवडून येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच संदर्भात लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते (Anil Thatte) यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर (Maharashtra Politics) मोठा अंदाज वर्तवला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे असं ते म्हणाले.
अजित पवार गटाला किती जागा मिळणार?
लोकसभा निवडणुकीचं भाकीत सांगताना अनिल थत्ते यांनी अजित पवार गटाबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या निवडणुकीत अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही. तर, शरद पवार गट हा अजित पवार गटापेक्षा जास्त सरस ठरणार आहे. तसेच, ठाकरे गटाबद्दल बोलताना "ठाकरे गटाला या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा होणार आहे" असा दावा थत्ते यांनी केला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रात महायुतीचेच सर्वाधिक उमेदवार जिंकणार असल्याचं भाकीत त्यांनी केलं आहे. यामध्ये महायुती सरकार महाराष्ट्रात 37 ते 40 जागा जिंकू शकतील तर इतर जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार असा मोठा दावा अनिल थत्ते यांनी केला आहे.
अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राबरोबर देशाच्या राजकारणाबाबतही भाकीत केलं आहे. त्यांनी देशात महायुतीच्या किती जागा येणार? यावर आपलं मत सांगितलं आहे.
महाराष्ट्रात महायुतीच्या संदर्भात बोलताना थत्ते म्हणाले की, "महाराष्ट्रात महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील असा माझा अंदाज आहे." तर, महाविकास आघाडीच्या बाबतीत काही अंशी प्रगती होईल. "महायुतीला जर 37 जागा मिळाल्या तर उर्वरित सीट महाविकास आघाडीला मिळतील. पण, दोन अंकी आकडा मात्र महाविकास आघाडी गाठेल असं मला वाटतं. तर, अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असा माझा अंदाज आहे." थत्ते म्हणाले. तसेच, अजित पवार गट आणि शरद पवार गटातील अंतर दाखवत ते म्हणले की, शरद पवार गट हा आधी सरस होताच पण आता तो जास्त सरस झाला आहे. तसेच, अजित पवारांना महायुतीत घेतल्याने आधीच तोटा झालाय. त्यांचे डझनभर मंत्री सोसावे लागले आणि त्यांच्यामध्ये ती लॉयल्टी दिसली नाही." असं देखील मोठं वक्तव्य अनिल थत्ते यांनी केलं आहे.
देशातील महायुतीच्या जागेसंदर्भात काय म्हणाले अनिल थत्ते?
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, यंदाच्या निवडणुकीत भाजपाने 400 पारचा नाराच लावला होता. यात सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा असेल असं गृहीत धरलं होतं. पण, माझा असा अंदाज आहे की, 35 ते 40 जागा महायुतीला मिळतील तर 8 ते 13 जागा महाविकास आघाडीला मिळतील. असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :